स्विमिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र मांडे

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव स्विमिंग असोसिएशनची वार्षिक स्नेहमिलन सभा आणि कोजागिरी कार्यक्रम नुकताच उत्साहात घेण्यात आला. सभेत स्विमिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र मांडे, उपाध्यक्षपदी दिगंबर (काळूशेठ) दायमा तर सचिवपदी ॲड.रणजीत पाटील यांची फेरनियुक्ती केली आहे.

यावेळी स्विमिंग असोसिएशनच्या कार्याचा वार्षिक आढावा रंजीत पाटील यांनी घेतला. तसेच योगा व व्यायामाचे महत्त्व योगशिक्षक नारायण मांडवडे यांनी सांगितले. चाळीसगावकर जलतरण व्यायाम प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने पोहण्याचा व्यायाम करावा, आपले आरोग्य उत्तम ठेवण्याबरोबरच आपला परिवार आणि समाज निरोगी कसा राहील, याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे जलतरण तलाव नियमित सुरु रहावा, यासाठी प्रशासन व व्यायामप्रेमी यांचे एकत्रित योगदान असल्यास चाळीसगावचा जलतरण तलाव उत्तम स्थितीत राहून चाळीसगावच्या सौंदर्यात भर घालेल, असे असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी मनोगतात सांगितले.

यावेळी जलतरण तलावाचे माजी अध्यक्ष रमेश सपकाळे, राजेंद्र बाफना, पवन बंग, कोतकर आबा, नगरपालिका बांधकाम विभागाचे दीपक देशमुख, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक बिरारी, सागर ढिकले, नानासाहेब पवार, डॉ.शिरीष पवार, डॉ.नंदकुमार लढे, डॉ.सुतवणे, दिलीप पवार, राजेंद कटारिया, शाम ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन मोरे, राहूल पवार, जितेंद्र वरखेडे, प्रकाश चौधरी, राजूशेठ सोनजे, टोनी पंजाबी, सुरेश मंधानी, नाना चौधरी, योगेश येवले, योगेश पवार, जलतरण प्रेमी व जलतरण तलावाचे व्यवस्थापक महेंद्र चौधरी, जिवरक्षक शाम जाधव सागर जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here