राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ उबाठातर्फे आंदोलन

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात घेतलेल्या पक्षपाती निर्णयाच्या विरोधात चाळीसगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुका व शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राहुल नार्वेकरांच्या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारत आक्रमक शिवसैनिकांनी आंदोलन करुन नार्वेकरांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनात शिवसेना उपजिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख कविता साळवे, शिवसेना माजी विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख महेंद्र जयस्वाल, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, उपशहर प्रमुख जगदीश महाजन, तालुका संघटक सुनील गायकवाड, युवा सेना माजी उपजिल्हाप्रमुख प्रशांत कुमावत, रघुनाथ कोळी, सजंय पातोंडेकर, रामेश्‍वर चौधरी, उपतालुकाप्रमुख हिम्मत निकम, रोहित जाधव तांबोळीकर, आबासाहेब पाटील तमगव्हाणकर, संजय ठाकरे, उपतालुकाप्रमुख नानाभाऊ शिंदे तरवाडेकर, उपतालुकाप्रमुख अनिल राठोड, विभाग प्रमुख आशिष सानप तमगव्हाणकर, गटप्रमुख देवचंद साबळे दरेगावकर, सुभाष राठोड चाळीसगावकर, अविनाश राठोड, रॉकी धामणे, समाधान राठोड पिंपळवाड तांडा, सचिन पाखले, हेमंत साळस्कर, संजय साळवे, नाना ठाकरे, शहर विभाग प्रमुख कांता राठोड, अल्पसंख्यांक शहरप्रमुख सुलताना यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here