आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात भालचंद्र पाटील यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शैक्षणिक संस्था ह्या देशाच्या विकासात्मक दृष्टिकोनाच्या पाया असतात. त्यासोबत विद्यार्थी गुणवत्ता विकासाचा विचार हा शालेय जीवनातूनच महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी संस्थाचालक आणि शिक्षक यांच्या समन्वयाची भूमिका विद्यार्थ्याला प्रगतीकडे घेऊन जाणारी असते, असे प्रतिपादन पीपल्स् बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील यांनी केले.सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव, चेअरमन व कार्यकारी मंडळाचे असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अनिल महाजन होते.
त्यांनी बोलताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या स्पर्धा परीक्षांचा पाया हा शालेय जीवनापासून रोवला गेला पाहिजे. त्यातून ते विद्यार्थी आपला सर्वांगिण विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकतील, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे सचिव विलासराव चौधरी, चेअरमन डी. यू.भोळे, संचालक सुनील चौधरी, उद्धवराव पाटील, गोपाळ भोळे, पंडित चौधरी, प्रमोद आटाळे, रत्नाकर महाजन, देविदास चौधरी, दिलीप अत्तरदे ह्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा भालचंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, मान्यवर मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी उद्धवराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक एल.जे. पाटील, पाहुण्यांचा परिचय संतोष कचरे, सूत्रसंचालन शुभांगीनी महाजन तर आभार सचिन जंगले यांनी मानले.