रेडियो मनभावन पोहचविणार ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ‘अटल वयो अभ्युदय योजना’

0
14

‘अटल वयो अभ्युदय योजना’ विषयी माहिती आता रेडियो मनभावनवर

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार ) व सामुदायिक रेडिओ संघटना, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आमचे ज्येष्ठ, आमचा अभिमान’ अभियानंतर्गत ‘अटल वयो अभ्युदय योजना’बद्दल जिल्ह्याभरात जनजागृती करण्यासाठी सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ. एम.च्या माध्यमातून पुढील ४ महिने राबविण्यात येणार आहे. ‘अटल वयो अभ्युदय योजना’ सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे ‘रेडिओ मनभावन’चे संचालक अमोल देशमुख यांनी सांगितले.

जळगाव शहरातील रामानंद नगर परिसरातील ‘ज्येष्ठ नागरिक मंडळ’ याठिकाणी ४०-४५ वयोवृद्ध नागरिकांच्या उपस्थितीत ‘अटल वयो अभ्युदय योजना’बद्दल कार्यक्रम घेण्यात आला. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले रेडियो मनभावन ९०.८ एफ. एम.जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे देशमुख म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष गुलाबराव बाविस्कर, अवचित पाटील, मधुकर पवार, गोटू देवरे, बरात पाटील, बाबुराव सोनवणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

संवाद नाटिका श्रोत्यांसाठी ऐकवली

यावेळी रेडियो मनभावनने प्रस्तुत केलेली संवाद नाटिका श्रोत्यांना एेकवण्यात आली. वयोवृद्ध नागरिकांच्या समस्या टोल फ्री नंबर १४५६७ या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तात्काळ सोडविण्यात येईल. तसेच बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. यशस्वीतेसाठी राहुल पाटील, साहिल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here