Leva Youth Association : लेवा नवयुवक संघातर्फे रविवारी वधू-वर परिचय मेळावा

0
10

एकलव्य क्रीडा संकुलाच्या पटांगणावर आयोजन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   

लेवा पाटीदार समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी आणि विवाहयोग्य तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी निवडता यावा, यासाठी सातत्याने कार्यरत लेवा नवयुवक संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे रविवारी, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता एकलव्य क्रीडा संकुलाच्या पटांगणावर आयोजन केले आहे.

वधू-वर परिचय संमेलनाचे नियोजन लेवा नवयुवक संघाने नियोजनबद्ध केले आहे. त्यात परिचय संमेलनासोबतच उपस्थितांसाठी विवाहयोग्य वधू-वरांची अद्ययावत सूची उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच समाज बांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी लेवा नवयुवक संघातर्फे मेळाव्याच्या ठिकाणी भोजनासह अल्पोपाहाराची उत्तम व्यवस्था केली आहे. लेवा पाटीदार समाज बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या भव्य वधू-वर परिचय मेळाव्याला समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here