Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Three People From Jalgaon Selected : अंनिसची नूतन राज्य कार्यकारिणी घोषित ; जळगावच्या तीन जणांची निवड
    जळगाव

    Three People From Jalgaon Selected : अंनिसची नूतन राज्य कार्यकारिणी घोषित ; जळगावच्या तीन जणांची निवड

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 6, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निवडीत डॉ. प्रदीप जोशी, प्रा.डी.एस.कट्यारे, विश्वजीत चौधरी यांचा समावेश

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित तीन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नुकतीच पार पडली. बैठकीत २०२५-२८ अशा तीन वर्षासाठी राज्य कार्यकारिणीची निवड प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडली. त्यात जळगाव जिल्ह्यातील तीन कार्यकर्त्यांची राज्याच्या कार्यकारिणीत नियुक्ती केली आहे. नूतन कार्यकारिणीत जळगावचे प्रा. डिगंबर कट्यारे यांची वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य कार्यवाह म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांचीही राज्याच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाच्या राज्य कार्यवाहपदी फेरनिवड केली आहे तर जळगावचे विश्वजीत चौधरी यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन निवड सहमती समितीने त्यांची राज्याच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाहपदी नियुक्ती केली आहे.

    कार्यकारिणीत २७ जिल्ह्यातील ७२ जणांचा समावेश

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याच्या अध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी सांगली येथील संजय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यासह ५ प्रधान सचिव आणि ७ राज्य सरचिटणीस आता पुढील तीन वर्षात प्रभावी नेतृत्व करणार आहेत. २७ जिल्ह्यातील ७२ जणांचा कार्यकारिणीत समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील २२ कार्यकर्त्यांसह राज्यभरातून बैठकीला ४६० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

    यांनी केले कौतुक

    निवडीबद्दल जळगाव जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे, जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, अशोक पवार, राजेंद्र बावस्कर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, तिन्ही प्रधान सचिव सुनील वाघमोडे, रवींद्र चौधरी, प्रा. दीपक मराठे यांच्यासह कार्यकर्ते, हितचिंतकांनी कौतुक केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : जळगाव बस स्थानकात एनसीएमसी मशीन बंद; ज्येष्ठ नागरिकांचे हाल

    April 11, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

    April 11, 2026

    Jalgaon : महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.