जामनेर प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील रामपूर गावातील एका भागात दहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी रविंद्र शिवराम भिल्ल (रा. नागणचौकी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जामनेर तालुक्यातील रामपूर या गावात राहत असलेल्या शेतरस्त्यावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी ही चारा आणण्यासाठी जात असताना संशयित आरोपी रविंद्र भिल्ल याने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संशयित आरोपीने पीडितेला बकरीसाठी चारा आणण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्याशी गैरवर्तन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तिच्या अंगावरील कपड्यांबाबतही गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी रविंद्र शिवराम भिल्ल याला अद्याप अटक झालेली नसल्याची नोंद पोलिसांच्या अहवालात आहे.
