चोपडा प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील विरवाडे गावातील एम.एस.सी.बी. सबस्टेशनच्या आवारातून तब्बल ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. या चोरीप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीला गेलेल्या मुद्देमालात स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आणि लोखंडी ट्रॅक्टर ट्रॉली आणि सुमारे सहा हजार रुपयांचे गौण खनिज वाळू यांचा समावेश आहे. सबस्टेशनच्या आवारातून हा मुद्देमाल गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणात राहुल प्रकाश कोळी, गोपाल उर्फ विरपाल प्रेमसिंग राजपूत, सुरेश वेळू कोळी, गणेश सुरेश कोळी आणि चेतन रतीलाल भोई, सर्व रा. विरवाडे, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
