Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Mini Ministry : मिनी मंत्रालय : सीईओंच्या संकल्पनेतून राबविले जातेय ‘मिशन संजीवनी’ अभियान
    जळगाव

    Mini Ministry : मिनी मंत्रालय : सीईओंच्या संकल्पनेतून राबविले जातेय ‘मिशन संजीवनी’ अभियान

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गालापुरला ग्रा.पं.,शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाची पाहणी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जिल्ह्यात वाढते तापमान, काँक्रिटीकरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. ही चिंताजनक घट भरून काढण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून “मिशन संजीवनी” हे अभियान राबविण्यात येत आहे. अशा अभियानांतर्गत एरंडोल तालुक्यातील गालापूर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण केले आहे. जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल यांनी स्वतः मंगळवारी, २७ मे रोजी कामाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.

    जळगाव जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो तर विहिरी अधिग्रहित करूनही पाण्याची समस्या कायम राहते. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘मिशन संजीवनी’ ही अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे. त्यानुसार, जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांकडून ग्रामीण भागात लोकोपयोगी इमारतींच्या बांधकामाला मंजुरी देतांना संबंधित मक्तेदारांना स्वतःच्या खर्चाने इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले आहे.

    श्रीमती करनवाल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, एरंडोल तालुक्यातील गालापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यास मदत होणार आहे.

    रिंगणगावात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

    दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच रिंगणगाव ग्रामपंचायत येथे भेट देत जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. रिंगणगाव येथे सुरू असलेल्या घरकुल बांधकामांच्या कामांची पाहणी करून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी गावातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही केले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.