मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षार्थींना डिजिटल स्क्रीन भेट

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरित अद्ययावत ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील धार्मिकते बरोबर सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पू. साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रास एक लाख अकरा हजार रुपयांचा भव्य डिजिटल स्क्रीन भेट देण्यात आला. स्क्रीनचे उद्घाटन जळगावच्या परिवर्तन संस्थेचे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, पू. साने गुरुजी ग्रंथालय तथा मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.महाले म्हणाले की, खान्देशातील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान झटपट मिळावे. त्यांचा स्पर्धा परीक्षेतील टक्का अधिकाधिक वाढावा, यासाठी डिजिटल स्क्रीन भेट दिला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी संस्थेतर्फे निरंतर मदत करण्यात येईल. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक विजयसिंह पवार, श्री.सोनवणे यांनी मनोगतातून त्यांच्या एकूणच कार्याचा लेखाजोखा मांडला. मंगळग्रह सेवा संस्थेचा त्यांनी ऋणनिर्देश केला.

यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्‍वस्त डी.ए.सोनवणे, प्रकाश मेखा यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजयसिंह पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here