शांतता, प्रेम अन्‌ संपत्ती वाचविण्यासाठी महत्त्वाकांक्षेपासून दूर रहा : आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्‍वरजी

0
2

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

शांतता, प्रेम अन्‌ संपत्ती वाचविण्यासाठी महत्त्वकांक्षेपासून दूर रहावे, असे निरुपण आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्‍वरजी यांनी केले. मुक्ताईनगर येथे शनिवारी, ९ मार्च रोजी आयोजित प्रवचन मालिकेत ‘दूर से ही प्रणाम’ विषयावर बोलत होते. आचार्यांनी शांतता, प्रेम आणि संपत्ती वाचविण्यासाठी महत्त्वकांक्षेपासून दूर रहा यासह पाच तत्त्वांपासून दूर राहण्याविषयी सांगितले.

पहिले तत्त्व ऍम्बिशन. खूप महत्त्वकांक्षा, जीवन आनंद ठेवायचे असेल तर महत्त्वकांक्षांना टाळा, ब्रॅण्डेड गोष्टींवर जगणे ही आपली सर्वात मोठी महत्त्वकांक्षा आहे. महत्त्वकांक्षा टाळण्यासाठी आपल्या घरात ब्रॅण्डेड वस्तू वापरण्याचा आग्रह सोडून द्या.

दुसरे तत्त्व एग्रेशन. आक्रमकता, तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे प्रेम मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमचे मन संतुलित ठेवावे लागेल. रणांगण असल्याप्रमाणे कुटुंबाला भेटु नका. जर तुमच्या सद्गुण (पुण्य) नसेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबावर जबरदस्ती करू नका.

तिसरे तत्त्व एडिक्शन. व्यसन, वाईट सवयी व व्यसनापासून दूर रहा. तुम्ही कप आणि बशी पाहिलेली आहे. कप चहाला गरम ठेवतो तर बशी चहाला थंड करते. आपण कपला नेहमी टांगत ठेवतो तर बशीला स्टॅन्डमध्ये ठेवतो. म्हणजेच जो गरम असतो त्याला सगळे टांगुन ठेवतात, आणि जो नेहमी थंड राहतो त्याची प्रत्येक जण काळजी घेतो.

चवथे तत्त्व एट्रेक्शन. आकर्षण, आपण आयुष्याचे सर्व निर्णय चर्मचक्षुच्या सहाय्याने घेतो तर आपल्याकडे विचार चक्षु, विवेक चक्षु आणि श्रद्धा चक्षुही असले पाहिजे.

अखेरचे पाचवे तत्त्व एसेप्शन. अनुमान, चुकीचे अनुमान करू नका. चहा फुंकायचा असेल तर फुंकुन घ्या. परंतु कोणाचे कान फुंकु नका. कृतीची शक्ती आपल्याला मन देते तर धर्माची शक्ती आपल्याला हृदय देते, अशा पाच तत्त्वांपासून दूर राहण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here