मुंबईतील साकीनाका परिसरात भीषण आग ; दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

0
2

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी 

मुंबईत पहाटे साकीनाका परिसरात मोठी आग लागली. या आगीत हार्डवेअरचं संपूर्ण दुकान जळून खाक झालं.अचनाक लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर केवळ अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं, मात्र 5 वाजता पुन्हा आग वाढली.

मुंबईत पहाटे ३ वाजता साकीनाका परिसरातल्या हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली होती. अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं, मात्र 5 वाजता पुन्हा आग वाढली होती. सकाळच्या सुमारास आग नियंत्रणात आली होती. मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोळ पसरले आहेत. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पहाटेच्या सुमारास आग लागली तेव्हा दुकानामध्ये एकूण 8 कामगार झोपले होते. त्यापैकी एकूण 6 जणांना बाहेर काढण्यात यश आलं. मात्र 2 जण आगीमध्ये अडकले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं मात्र यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीच्या या घटनेत राकेश गुप्ता ( 22 ) , रमेश देवसिया ( 23 ) अशा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती साकीनाका पोलीसांनी दिली. पोलीस या घटनेचा पूर्ण तपास करत आहेत.

पहाटे अचानक लागलेल्या आगीत दोन दुकानं मात्र जळून खाक झालं आहे. आग कशामुळे लागली, या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here