मलकापूर : प्रतिनिधी
येथील स्थानिक विश्रामगृहावर उद्धव ठाकरे गट रेल्वे कामगार सेना तथा मलकापूर विधानसभा संपर्क प्रमुख ललित मुथा यांचे अध्यक्षतेखाली शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुकाप्रमुख दिपक चांभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ ऑगस्ट रोजी महत्वपूर्ण बैठक उत्साहात झाली.
या बैठकीत गत सप्ताहात दि.१६ ऑगस्ट रोजी मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते खा.संजय राऊत,शिवसेना नेते खा.अनिल देसाई,रेल्वे कामगार केंंद्रीय अध्यक्ष तथा खा.विनायक राऊत आदींनी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संपर्क प्रमुख ललित मुथा, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, उपजिल्हा प्रमुख संजयसिंह राजपूत, मलकापूर शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुका प्रमुख दिपक चांंभारे, नांदुरा तालुकाप्रमुख ईश्वर पांंडव, शहरप्रमुख लालाभाऊ इंगळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून घेतला असल्याची माहिती मुथा यांनी बैठकीत दिली.
सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक,तथा अंगीकृत युवासेना,महिला आघाडी, रेल्वे कामगार सेना आगामी निवडणुका लक्षात घेता पदाधिकाऱ्यांनी कामाला लागून “गाव तेथे शाखा,घराघरात शिवसैनिक अभियान “ राबविण्याचे आव्हान उद्धवसाहेब ठाकरे यांनी आढावा बैठकीदरम्यान केले असल्याचे मुथा यांनी सांगितले.
रेल्वे कामगार सेना, मलकापूर शहर व तालुका शिवसेना, युवासेनेच्या वतीने विधानसभा संपर्क प्रमुख ललित मुथा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वे कामगार सेनेचे लक्ष्मण आबदाने, मुकुंद मोरे,डी.डी.पाटील, सदानंद ब्राम्हणे, गोपाळ उमाळे, शिवसेना उपशहरप्रमुख बाळु पोलाखरे, शकिल जमादार,समद कुरेशी,प्रा.कृष्णा मेहसरे,युवासेना शहरप्रमुख पवन गरुड, युवासेना तालुकाप्रमुख गणेश सुशीर, कामगार सेना तालुका प्रमुख राम थोरबोले,शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना तालुका प्रमुख महादेव पवार, शहरप्रमुख सै.वसीम,सोशल मीडिया तालुकाप्रमुख आकाश बोरले, रामराव तळेकर,माजी नगरसेवक पांडुरंग चिम यांच्यासह शहर व तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.