साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा तालुका सह. संस्था संचलित गो.से.हायस्कूल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रमिला वाघ उपस्थित होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील, ज्येष्ठ शिक्षक पी.एम.पाटील, संगीता वाघ, प्रतिभा पाटील उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन, सरस्वती पूजन तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरुवातीला एक ते सहा तासिका प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांनी घेतल्या. विद्यार्थीच शिक्षक झाल्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, शिपाई स्वतः विद्यार्थी झाल्याने अनेक सहभागी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. भविष्यात आम्ही याचा बोध घेऊ, असा आशावाद आपल्या मनोगतात व्यक्त करून दाखविला. विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करुन शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले.
यांनी व्यक्त केले मनोगत
मनोगत व्यक्त करणाऱ्यांमध्ये स्तवन भट, विधी पाटील, देवांशी सावलिया यांचा समावेश होता. यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग उपप्रमुख आर.बी. बोरसे, शितल महाजन, कलाशिक्षक प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे, रणजीत पाटील, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रुचित वाघ, सूत्रसंचालन किमया पाटील, भूमिका पाटील तर आभार जीविका पाटील हिने मानले.