पंतप्रधानांच्या मंदिर स्वच्छता अभियानाला डॉ.केतकी पाटील यांचा प्रतिसाद

0
4

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ते २१ जानेवारी दरम्यान मंदिर स्वछता अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांनी मंगळवारी, १६ जानेवारी रोजी भुसावळ येथील श्री अष्टभुजा देवी मंदिरापासून स्वच्छता व सुशोभीकरणास प्रारंभ केला.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम चंद्राच्या अयोध्याधाम येथे येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी विराजमान सोहळा व मंदिर उद्घाटनाचे भव्य आयोजन केले आहे. त्या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर व परिसर स्वछता अभियान करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ.केतकी पाटील यांनी मंदिर स्वच्छता अभियानास मंगळवारपासून प्रारंभ केला. सकाळी भुसावळ येथील अष्टभुजा देवी मंदिरात डॉ.केतकी पाटील यांनी स्वत: हातात झाडू घेत स्वच्छता केली. तसेच प्रांगणात रांगोळीही साकारुन सुशोभीकरण केले. याप्रसंगी मंदिरातील विशाल ठक्कर, सीमा ठक्कर, रुपाली ठक्कर, पुजारी भट्ट उपस्थित होते. याप्रसंगी रुपाली ठक्कर यांनी डॉ.केतकी पाटील यांचे स्वागत करुन ओटी भरली.

प्रसन्न वातावरण आणि निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता असणे खूप गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्वांना मंदिर स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले. त्यानुसार मंदिर स्वच्छता अभियान सुरु केले आहे. नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे, मंदिरांसोबतच आपले घर, परिसरात स्वच्छता करावी, जेणेकरून आरोग्य चांगले राहील, असे डॉ.केतकी पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here