साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील मध्य भारत संयुक्त खान्देश लाड सुवर्णकार समाजातर्फे गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवसाचे औचित्य साधून सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून दीपक मुरलीधर पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष सतिष मुंडके होते. याप्रसंगी सर्वश्री दिलीप कुळथे, बाळू पांडव, शिवाजी कुळथे, अविनाश पांडव, हेमंत पवार, डॉ.राजेंद्र सोनार, संजय मुंडके, गिरीश सराफ, कुलदीप मुंडके, योगेश पांडव, कुणाल सोनार, हिमांशु सोनार, मितांशु सोनार, राहुल सोनार, तुषार सोनार, विलास सोनार, डॉ.विजय पवार, शिरीष डहाळे, कैलास नागोरे, निलेश नागोरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा योगिता डहाळे, शितल सोनार यांच्यासह समाज बांधव, भगिनी उपस्थित होते.
गणरायाच्या महाआरतीनंतर सतिष मुंडके यांच्याकडून महाप्रसादाची व्यवस्था केली होती. याबद्दल हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर, सचिव दिलीप पाटील, जिल्हा सदस्य एन.आर चौधरी, मनीष उघडे, खजिनदार राजेंद्र पाटील, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन, मार्गदर्शक सोन भवरे, सदस्य मुनाफ तडवी, कमलाकर संदानशिव, प्रदीप चौधरी, योगेश्वरी पाटील, कविता मनोरे यांच्यासह हिंदी अध्यापक मंडळाचे सदस्यांनी कौतुक केले.