राजेश्वर शिव मंदिरात जलाचा अभिषेक

0
3

मलकापूर : प्रतिनिधी

ओंकारेश्वर ज्योर्तिलिंग ते मलकापूर तब्बल २०० कि.मी. पायी कावड आणि छत्रपती शिवाजी नगर येथील राजेश्वर शिव मंदिरात जलाचा अभिषेक करण्यात आला. कावडधारी जय भवानी मंदिर ट्रस्टचे सचिव गजानन चव्हाण, अनिल सूर्यवंशी, गजराज साळुंके, गोलू पोंदे यांचे छत्रपती शिवाजी नगर वासियांनी ढोल-ताशाच्या निनादात रांगोळी काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले.

बऱ्हाणपूर येथील शिवभक्त दरवर्षी ओंकारेश्वर ते बऱ्हाणपूर कावड यात्रेचे आयोजन करतात. शांतनु पाटीदार यांच्या अध्यक्षतेखाली ही कावड आयोजित केली जाते. छत्रपती शिवाजीनगर येथील चार जण बऱ्हाणपूर येथील पंकज मोरे यांच्या माध्यमातून यात्रेत सहभागी झाले होते. १८ ऑगस्ट रोजी ही यात्रा ओंकारेश्वर येथून निघून दररोज ४० कि.मी. पायी चालून त्यांचा मुक्काम होत होता. दोंडवा, रूस्तमपूर व झिरी येथे मुक्काम करून २१ ऑगस्ट रोजी ही यात्रा बऱ्हाणपूर येथे समाप्त झाली. बऱ्हाणपूर येथून छत्रपती शिवाजी नगर येथील जय भवानी मंदिर ट्रस्टचे सचिव गजानन चव्हाण, अनिल सूर्यवंशी, गजराज साळुंके आणि गोलू पोंदे या चौघांनी ही कावडयात्रा पुढे आणत २१ ऑगस्ट रोजी पुर्णाळफाटा येथे मुक्काम करून २२ ऑगस्टला छत्रपती शिवाजीनगर येथे दाखल झाले. राजेश्वर मंदिर येथे कावडमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करत शिवाची आराधना केली.

औक्षण करुन केले स्वागत

यावेळी माजी आमदार वसंतराव शिंदे, माजी नगरसेवक राजूभाऊ डोफे, साहेबराव जगताप, शिवाजीराव भोईटे, राम थोरबोले, संजय भोईटे, मदनराव राठोड, गंगेश्वर कॅटर्सचे भानुदास फुलोरकर, प्रमोद परदेशी, राजकुमार वानखेडे, विजयकुमार हांडगे, राम जगताप, श्याम शिकेतोड, संजय मोरे, राम शिकेतोड, पांडूरंग चिम, किशोर लोंढे, निंबाजीराव घुले, सुभाष पवार, भानुदास सुर्यवंशी, प्रतिक शिंदे आदींसह छत्रपती शिवाजी नगरातील महिलांनी कावडधाऱ्यांचे औक्षण करून स्वागत करत ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here