BJP’s District President : भाजपाच्या पूर्व जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बाविस्कर, पश्चिमसाठी डॉ.राधेश्याम चौधरी

0
20

जळगाव महानगराध्यक्षपदी पुन्हा दीपक सूर्यवंशी यांना संधी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

भारतीय जनता पक्षाने पूर्व व पश्चिम जिल्हाध्यक्षांसह जळगाव महानगराध्यक्ष्यांची निवड जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. अखेर पक्षाच्या प्रदेश पातळीवरून याबाबतची घोषणा केली आहे. त्यात पक्षाच्या पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेर येथील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तर पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी तर जळगाव महानगराध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक सूर्यवंशी यांना संधी मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची पावती त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यास कारणीभूत ठरली आहे. तसेच जामनेर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी चंद्रकांत बाविस्कर यांनी समर्थपणे सांभाळली आहे. ते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दीपक सूर्यवंशी यांनी यापूर्वीही महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळलेली असल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here