नवापुरला श्रीकृष्ण जन्माष्टमीसह दहीहंडीचा उत्सव साजरा

0
21

साईमत, नवापूर : प्रतिनिधी

शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री कृष्ण जन्मोत्सवानिमित्त जगन्नाथ महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. गुरुवारी जुन्या महादेव मंदिर गल्लीत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला.

श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मंदिरात फुगे व फुलांची आकर्षक सजावट केली होती. अनेकांनी उपवास करण्यास प्राधान्य दिले होते तर लहान बालकांना बाळ कृष्ण सजविण्यात आले होते. श्रीकृष्ण जन्मोत्सवप्रसंगी भजन, कीर्तन व गरबा रास खेळण्यात आले. बुधवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण जन्मोत्सव व आरती करण्यात आली. याप्रसंगी तरुण मंडळीसह महिलाही सहभागी झाले होते.  नवापूर शहरातील श्रीकृष्ण मंदिरात सरदार चौक ते जगन्नाथ महादेव मंदिर मार्गावर गोविंदा पथक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गोविंदा पथकांनी पाण्यात भिजत श्रीकृष्ण व ‘गोविंदा आला रे आला’ अशा विविध दहीहंडीच्या गाण्यावर ठेका धरत सायंकाळी क्रेनवर लावण्यात आलेली दहीहंडी फोडण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन जुनी महादेव गल्लीतील श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव समितीतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव आयोजन केले होते.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा डोकरे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गावित, पंचायत समितीचे सदस्य राजेश गावित, माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे, माजी नगरसेविका रीना पाटील, माजी नगरसेवक महेंद्र दुसाने, संजय राणा, शरद पाटील, लक्ष्मण टिभे, यशवंत पाटील, विनायक पाटील, मदन पाटील, जितेंद्र गुरव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव समितीचे प्रशांत राजपूत, डॉ.सुनील पवार, कौशल टिंभे, लखन पाटील, योगेश पाटील, समितीचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी, उपाध्यक्ष सचिन ब्रम्हे, राहुल टिभे, प्रदीप पाटील, दिनेश पाटील, अल्पेश राजपूत, शुभम पाटील, दिनेश गावित, यश राजपूत, दिनेश खैरनार, मयूर टिंभे, तुषार पाटील, जयेश पाटील, राधेश्याम पाटील, राकेश धोडिया, भावीन राणा, मनीष राणा, अरविंद ब्रम्हे, राहुल ब्रम्हे, शैलेश पाटील, प्रशांत पाटील, राहुल सेन, प्रकाश पाटील, राज राणा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here