अ.भा. ग्राहक पंचायतीचा स्थापना दिवस साजरा

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्राहक पंचायतने ग्राहक पंचायतीचा स्थापना दिवस नुकताच उत्साहात साजरा केला. सर्वप्रथम ग्राहकतीर्थ स्व.बिंदू माधव जोशी, स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी अ.भा.ग्राहक पंचायत अमळनेरचे सक्रिय कार्यकर्ते जयंतीलाल वानखेडे यांची महाराष्ट्र मराठी पत्रकार तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. श्रीमती विमल मैराळे यांनी सभासद वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दलही त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. नूतन सभासद म्हणून आर.एस.पाटील यांनी प्रवेश घेतला. यावेळी त्यांचाही सत्कार केला.

कार्यक्रमास ऊर्जा मित्र सुनील वाघ, गोकुळ बागुल, शिवाजीराव पाटील, हस्ती बँकेचे व्यवस्थापक अनिल शिंपी, राजेश अग्रवाल, मेहराज बोहरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी, ॲड.भारती अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा सायबर तथा बँकिंग प्रमुख विजय शुक्ला यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here