साईमत : जळगाव : प्रतिनिधी
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित महिला मंडळ जळगाव याच्या वतीने श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक सांस्कृतिक सभागृहात श्रावण सखी व मंगळागौर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिक्षक दिनानिमित्त समाजातील २१ गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मंगळागौर, कानबाई गाणे आदींवर बहारदार नृत्य केले कार्यक्रमातून प्रथम विजेते गोणाई महिला मंडळ, द्वितीय विजेते सावित्रीबाई महिला मंडळ, तिसरे पारितोषिक मनकर्णिका मंडळ तर उत्तेजनार्थ देवरे ग्रुप यांनी पटकावले. सखी क्वीन अंतर्गत तेजस्विनी कापुरे यांनी प्रथम मानाचा मुकुट मिळाला, द्वितीय क्रमांक दीपिका शिंपी, तृतीय क्रमांक वैशालीताई शिंपी यांना मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला अध्यक्षा अंजली बाविस्कर होत्या. महिला अध्यक्षा रेखा निकुंभ यांनी उत्कृष्ट आयोजन केले. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून शैलजा चौधरी या उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत “महाराष्ट्र क्वीन” अंकिता वाघुळदे यांनी देखील उपक्रमाचे परीक्षण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा जगताप यांनी केले. यशस्वीतेसाठी माधुरी शिंपी, माधुरी मेटकर, विद्या सोनवणे, सरोज खैरनार, अलका खैरनार, वैशाली भंडारकर, रत्ना जगताप, रेखा सोनवणे, वैशाली शिंपी आदींसह समाजातील महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.