Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»राज्यातील प्रत्येक मतदारसंघात भाजपची ‌‘वॉर रुम‌’
    मुंबई

    राज्यातील प्रत्येक मतदारसंघात भाजपची ‌‘वॉर रुम‌’

    SaimatBy SaimatAugust 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुंबई : प्रतिनिधी

    राज्यातील प्रत्येक लोकसभा,विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आता महिनाभरात सर्व ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक ‌‘वॉर रुम‌’ सुरू करण्यात येणार आहे. भाजपकडून जे मतदारसंघ शिवसेना (िंशदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांसाठी सोडल्या जातील, तेथेही भाजपचे निवडणूक प्रमुख राहतील आणि या ‌‘वॉर रुम‌’चा त्यांनाही उपयोग होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले.
    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तेतील सहकारी पक्षांच्या उमेदवारांनाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यामुळे ज्या जागा सहकारी पक्षांकडे जातील,तेथे त्यांना भाजपच्या निवडणूक यंत्रणेचा उपयोगच होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

    भाजपने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या सर्व विद्यमान आमदार-खासदार यांची उमेदवारी निश्चित नसली, तरी त्यांना आपल्या मतदारसंघात ‌‘वॉर रुम‌’ सुरू करण्याच्या सूचना पक्षाने नुकत्याच जारी केल्या आहेत. ज्या ठिकाणी भाजपचे आमदार-खासदार नाहीत, तेथे भाजपने मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त केले आहे. त्यांना वॉर रुम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. त्यांचे जागावाटप अद्याप झालेले नाही. पण जेथे ज्या पक्षाचे विद्यमान आमदार-खासदार आहेत, त्या जागा शक्यतो त्या पक्षांकडेच राहतील, असे सूत्र आहे.
    काही जागांची अदलाबदल होऊ शकते. ज्या जागा भाजप, िंशदे व अजित पवार गटाकडे नाहीत, त्या जागांचे वाटप भाजप पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार केले जाणार आहे. पण सध्या भाजपने सर्व लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये वॉर रुम आणि अन्य यंत्रणा उभारून तयारी सुरू केली आहे.

    महाजनसंपर्क अभियान
    भाजपने महाजनसंपर्क अभियान सुरू केले असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ६० हजार घरी जाण्याच्या आणि किमान ३० हजार नागरिकांच्या मोबाईलवर ‌‘सरल ॲप‌’ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी व्हॉट्‌‍सॲप समूह तयार कराव्ोत, प्रत्येक आमदार, खासदार व निवडणूक प्रमुखाने समाजमाध्यमांवर सक्रिय असाव्ो, असे सांगण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे २० ऑगस्ट ते ४ नोव्हेंबरपर्यंत २८ लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा; सरकारने व्यावसायिक एलपीजीचा 20% कोटा दिला

    March 13, 2026

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.