सैन्य दलातून बापु चौधरी सेवानिवृत्त

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील बापु चौधरी यांनी भारतीय सैन्य दलात वीस वर्षे देशाची सेवा बजावली. त्यात त्यांनी काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, पुणे अश्ाा ठिकाणी देशाची सेवा केली. ते दोघे भाऊ सैन्यात आहे. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर रेल्वे स्थानकापासून माजी सैनिक त्रिदल सेना उत्तर महाराष्ट्र आबासाहेब गरुड यांच्या टीमने मिरवणूक गाजत वाजत काढली. मिरवणुकीत देशसेवेचे गाणे वाजविण्यात आले.

यावेळी विकास देवरे, गोविंद वाघ, नितीन परदेशी, वाल्मिक बागुल, समाधान राठोड, गुलाब पाटील, विजय पाटील, मनोज महाडिक यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here