Author: Vikas Patil

जळगाव (प्रतिनिधी)- धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुकचा ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणेला (वय ३७) २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. आरोपीने तक्रारदाराकडून गटारी आणि गावहाळ बांधकामाच्या बिलाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने खर्दे बुद्रुक गावात २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते, त्यांना २ लाख ६४ हजार रुपयांचे चेक मिळाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी १० टक्के लाचेची मागणी (२७ हजार रुपये) केली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्चरोजी दुपारी सापळा रचण्यात…

Read More

कृषिमंत्री कोकाटेंसह 4 आमदार, खासदारांना नोटीस नाशिक ( प्रतिनिधी)- जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या कर्ज वाटपातील अनियमिततेमुळे २५ माजी संचालक आणि त्यांच्या वारसांवर निश्चित केलेल्या जबाबदारीच्या मुद्द्यावर सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. यात कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह चार आमदार आणि खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचाही समावेश आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांना कर्ज वाटप वा ठेवीदारांना पैसे परत करण्यात सध्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बँकेवर परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी केली होती. त्यात २९ आजी-माजी संचालक आणि १५ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत ४४ जणांवर १८२ कोटींची जबाबदारी निश्चित करण्यात…

Read More

औरंगजेबाच्या कबरीचा संरक्षित स्मारक दर्जा काढा ; हायकोर्टात याचिका नाशिक ( प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक दर्जावरून वाद निर्माण झाला आहे. हा दर्जा काढण्यासाठी नाशिक येथील रतन लथ यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत लथ यांनी दावा केला आहे की, “कबर १९५२ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली होती. मात्र, काही संघटनांचा यावर आक्षेप असून, या कबरीला दर्ग्याचा दर्जा देणे चुकीचे आहे. यामुळे देशप्रेमी मुस्लिम समाज अडचणीत आला आहे”. ज्याने चुकीच्या पद्धतीने राज्य केले, त्याच्यासाठी आपण भांडणे का करायची? तो बादशहा नव्हता, मुळात तो आपला नव्हताच. भारतात त्याचा जन्म झाला असेल,…

Read More

३५६ उन्हाळी विशेष रेल्वे धावणार जळगाव ( प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं ३५६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यापैकी काही गाड्यांना जळगाव आणि भुसावळला थांबा आहे. पुणे-नागपूर एसी विशेष गाडीच्या २४ फेऱ्या, पुणे-नागपूर सुपरफास्ट गाडीच्या २४ फेऱ्या आणि दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष गाडीच्या १८० फेऱ्या नियोजित आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण २४ मार्चपासून सुरू होणार आहे. गाडी क्रमांक 01469 ही साप्ताहिक विशेष गाडी पुणे येथून दर मंगळवारी दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता नागपूरला पोहचेल. गाडी क्रमांक 01470 ही वातानुकूलित विशेष गाडी नागपूरमधून दर बुधवारी सकाळी 8 वाजता सुटेल आणि…

Read More

धावत्या बसच्या चालकाला अर्धांगवायूचा झटका ; उपचारादरम्यान मृत्यू यावल ( प्रतिनिधी) येथील आगारातून भुसावळकडे बस घेऊन जात असताना ५८ वर्षीय एसटी बसचालकाला अंजाळे गावाजवळ अचानक अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. प्रसंगावधान राखत त्यांनी बस थांबवली. नागरिकांनी तातडीने त्यांना भुसावळ आणि नंतर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चालक शालिक पाटील-बारी (वय ५८, रा. जुना भाजी बाजार, बारी वाडा, यावल) हे यावल एसटी आगारातून भुसावळकडे बस घेऊन निघाले होते. अंजाळे जवळ अचानक त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. प्रसंगावधान राखत त्यांनी बस थांबवली. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावल आगारातील अनुभवी चालकाच्या आकस्मिक निधनामुळे शहरात…

Read More

जळगाव जिल्ह्यात पावसाचा हवामानाचा अंदाज ! जळगाव ( प्रतिनिधी)- तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काहीसा पाऊस झाला जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता दिसून येत आहे. २२ ते २६ मार्च दरम्यान कमाल तापमान ३८ ते ४० अंशांवर व किमान तापमान १८ ते २० अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी आकाश निरभ्र असेल तर हलकेसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे एकीकडे राज्यात तापमानाचा पारा वाढून उष्णतेत मोठी वाढ झाली असून त्यातच वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. कुठे उकाडा तर, कुठे पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट येणार असून राज्यात मुसळधार…

Read More

आमदार चित्रा वाघांशी रोहिणी खडसे यांचीही जुंपली मुक्ताईनगर ( प्रतिनिधी)- आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत केलेल्या भाषणावरून रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला यातून या दोन्ही महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी त्यांना संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आमदार वाघ यांनी विधानपरिषदेत त्यांना प्रत्युत्तर दिले. यावरून सोशल मीडियात चर्चा सुरू असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावर तिखट भाष्य केले आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, चित्रा वाघ यांचे वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉसची सिरीयलची आठवण झाली. यामध्ये एकमेकांची…

Read More

पाडळसरे धरणात दोन वर्षांत पाणी येईल – बोरकर अमळनेर ( प्रतिनिधी)- निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणात दोन वर्षांत पाणी अडवले जाईल, असे नियोजन असून बांधकामाला वेग देण्यात आला आहे. पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ज. द. बोरकर यांनी ही माहिती दिली. धरणाच्या गेटसाठी टाय प्लेट्स पोहोचल्या असून, गर्डर बसविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाचा निधी जूनपर्यंत खर्च करण्याचे नियोजन असून पुढील वर्षी निधी प्राप्त झाल्यास दोन वर्षांत धरणाचे गेट्स पूर्णत्वास येतील आणि पाणीसाठा दिसू लागेल. पाडळसरे धरण जनआंदोलन समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे. या समितीने मुख्य अभियंता बोरकर यांची भेट घेतली. बैठकीत…

Read More

विव्हळणारा कुत्रा पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन उपायुक्तांना बोलावले जळगाव (प्रतिनिधी) -जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर इजा झालेली होती. संसर्गामुळे वेदनेने विव्हळणाऱ्या या मुक्या जीवाकडे पाहताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने उपायुक्त, पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले. जिल्हाधिकारी यांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय पथकाला तत्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झाले त्यांनी जखमी कुत्र्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवले. माणसाने मुक्या जीवांचीही काळजी घ्यावी, या तत्त्वावर विश्वास ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयाने आणखी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र लाटेत तहानलेली पाखरे पाण्यासाठी तडफडू नयेत म्हणून कार्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. याच उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी आयुष…

Read More

जळगावात सोने , चांदी स्वस्त जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील सराफ बाजारात बुधवारी सोन्याचे दर उच्चांकी ९१ हजार ८७६ रुपये आणि चांदीचे दर एक लाख पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. या तुलनेत शुक्रवारी सोन्याचे दर तोळ्यामागे ५०० रुपयांनी कमी होऊन ९१ हजार ३६१ रुपये आणि चांदीचे दर किलोमागे तीन हजार रुपयांनी कमी होऊन एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत खाली आले. गुरूवारी सोने दरात ३०० रुपयांनी तसेच चांदी दरात एक हजार रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी देखील सोने दरात गुरूवारच्या तुलनेत प्रति तोळा २०० रुपयांची आणि चांदी दरात प्रति किलो दोन हजार रुपयांची घसरण झाली. तरीही तीन टक्के जीएसटीसह सोन्याचे दर ९१ हजारावर…

Read More