नाशिक जिल्ह्यात यंदा २०० टँकर्सचा प्रशासकीय अंदाज नाशिक ( प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासनाने यंदा चांगला पाऊस झाल्याने गतवर्षाच्या तुलनेत टँकरला कमी मागणी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तरीही गतवर्षाच्या टंचाईचा अंदाज घेत यंदा २०० टँकरचे व ८ कोटी रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. सिन्नर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा भागातील वाड्या वस्त्यांवर टंचाईच्या झळा जाणवतात. यंदा त्या में अखेरपासून वाढण्याची चिन्हे आहेत. इगतपुरीला पाण्यासाठी महिलांनी मोर्चा काढल्याने एक टँकर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यातील ४८४ गावे व ५६७ वाड्यांना १४७ टँकरचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ४६ गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहण करण्यासाठी २० लाख ७० हजार, तर…
Author: Vikas Patil
जिल्ह्यात २६९७ शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ३ हजारांची भरपाई जळगाव (प्रतिनिधी)- नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या धुळे व जळगाव जिल्ह्यातील २६९७ शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच ३ कोटी २२ लाख ३ हजारांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यावल व रावेर तालुक्यातील पिकांना फटका बसला होता. केळी उत्पादक भागातील केळीच्या बागा पाऊस आणि गारांच्या माऱ्याने कोलमडून पडल्या होत्या. रब्बीच्या पिकांचेही नुकसान झाले होते. हरभरा, गहू, तूर, पपईचेही नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांनी बैलगाड्यांमध्ये आणलेला कापूसदेखील ओला झाल्याने त्यांना…
एटीएममधून मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांचे शुल्क वाढले मुंबई ( प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज फी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे १ मे २०२५ पासून ग्राहकांना आता एटीएममधून त्यांच्या बँकेच्या मोफत व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क प्रत्येक व्यवहारावर १९ रुपये शुल्क लागू होईल हे शुल्क पूर्वी १७ रुपये होते. खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी आता ७ रुपये आकारले जातील, जे आधी ६ रुपये होते. एटीएम इंटरचेंज फी म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला एटीएम सेवा पुरवण्यासाठी दिले जाणारे शुल्क. हे शुल्क सहसा ग्राहकांकडून त्यांच्या बँकिंग खर्चाचा भाग म्हणून वसूल केले जाते. मेट्रो शहरांमध्ये: ग्राहकांना दरमहा ५ मोफत व्यवहार करता येतात,नॉन-मेट्रो…
जे.एस. देवरे यांना ‘सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक’ पुरस्कार अमळनेर ( प्रतिनिधी)- पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांना अतुलनीय कामगिरीबद्दल ‘इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड’ संस्थेच्या ‘सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मुंबईतील पवई येथील हिरानंदानी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर कार्यरत इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड संस्थेने २०२४-२५ या वर्षासाठी हा पुरस्कार दिला आहे. जे.एस. देवरे यांची २८ वर्षांची शैक्षणिक कारकीर्द आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी यांचा विचार करून त्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले. हा पुरस्कार भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी डॉ. किरण बेदी आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारासोबतच जे.एस. देवरे…
अपत्यांची माहिती लपविली ; राजूरेचा ग्रा.पं. सदस्य अपात्र जळगाव (प्रतिनिधी)- मुक्ताईनगर तालुक्यातील राजूरे गावातील ग्रामपंचायत सदस्य श्रावण काशिनाथ धाडे यांनी अपत्यांची माहिती लपविल्यामुळे तसेच मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषीत केले आहे. श्रावण धाडे यांनी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी राखीव जागेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणून नियुक्ती मिळवली होती. मात्र, नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्या तीन अपत्यांपैकी केवळ दोनच अपत्यांची माहिती दिली तिसऱ्या अपत्याची माहिती लपवली होती. अशोक भोलाणकर, राहुल रोटे आणि योगेश कांडेलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत श्रावण धाडे यांनी राखीव प्रवर्गातून निवडून येऊन मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र…
अहिराणी साहित्य भूषणसह गौरव पुरस्कार जाहीर अमळनेर( प्रतिनिधी)- येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाf अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरीत ३० आणि ३१ मार्च रोजी होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या कलाकारांना आणि साहित्यिकांना गौरविण्यात येणार आहे. अहिराणी भाषेला सन्मान मिळवून देणारे आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णा पाटील यांना ‘अहिराणी साहित्य भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. कृष्णा पाटील यांच्या साहित्यातून अहिराणी संस्कृती आणि भाषेची समृद्धता दिसून येते. अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या युवक आणि कलाकारांना ‘अहिराणी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. यात निकिता पाटील, अशोक…
जिल्ह्यात ३२ नवी आधार केंद्रे सुरू होणार जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील २५ महसूल मंडळे आणि ७ शहरी भागांमध्ये नवीन आधार केंद्र सुरू करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालयाने अर्ज मागवले आहेत. इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी २ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी केले आहे. सध्या ज्या महसूल मंडळांमध्ये आधार केंद्र नाहीत, अशा भागांमध्ये आधार केंद्र सुरू होणार आहेत. इच्छुक अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.jalgaon.gov.in वरून अर्जाचा नमुना, पात्रता निकष, रिक्त महसूल मंडळांची नावे आणि आवश्यक माहिती घ्यावी. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे https://forms.gle/Bn1s4filH1SDDQB97 या गुगल लिंकवर २ एप्रिलपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवावीत.
बांभोरी गिरणा नदीवर ट्रॅक्टर नादुरुस्त महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा उभी बुलेट पेटली; नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला जळगाव (प्रतिनिधी)- बांभोरी येथील गिरणा नदीवरील ऐन पुलावर खडीने भरलेला ट्रॅक्टर नादुरुस्त झाल्याने दुपारी महामार्ग जाम झाला होता. याच वेळी पुलावर उभ्या असलेल्या बुलेटने अचानक पेट घेतला मात्र या वेळी तेथील नागरिकांनी माती टाकून ती आग आटोक्यात आणली. आज दुपारी तीन वाजेच्यासुमारास खडी घेऊन जाणारे ट्रॅक्टर अचानक नेमके पुलावरच नादुरुस्त झाले. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला महामार्ग जाम झाला होता. जळगावहून येणारी वाहतूक मानराजपर्यंत तर जळगांवला जाणारी वाहतूक पाळधी वळण रस्त्यापर्यंत खोळंबली होती. यात अनेक चाकरमान्यांचे उन्हाच्या तीव्रतेने हाल झाले. दुपारी नोकरीनिमित्त जाणारे व शाळेतून घरी…
आता सर्वोच्च न्यायालयातही ‘एआय’चा वापर मुंबई (प्रतिनिधी)– सर्वोच्च न्यायालयात आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. न्यायालयीन प्रक्रिया प्रभावी आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. केंद्रीय मंत्री मेघवाल यांनी स्पष्ट केले की सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाच्या खटल्यांमध्ये तोंडी युक्तिवाद आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने भाषांतरित केले जात आहेत. प्रामुख्याने तोंडी युक्तिवाद लिहिणे, केस दाखल करणे आणि कायदेशीर कागदपत्रांचे भाषांतर करणे यासाठी एआयचा वापर होत आहे. मात्र, न्यायालयीन निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार नाही. न्यायाधीशांना कायदेशीर संशोधनात मदत करण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग केला…
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार यावल (प्रतिनिधी)– पाण्याच्या शोधात शहरात शिरलेल्या हरणाला कुत्र्यांनी लचके तोडत ठार केल्याची घटना शनिवारी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या आवारात उघडकीस आली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. घटनास्थळाचा पंचनामा करून हरणाचे शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. फैजपूर ते सावदा रस्त्यावरील धनाजी नाना महाविद्यालयाच्या आवारात हरीण मृत अवस्थेत आढळून आले. या हरणाच्या मागे भटक्या कुत्र्यांचे टोळके लागले होते. या कुत्र्यांनी हरणचा लचका तोडला आणि त्यात या मादी हरणीचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी वनपाल सतीश वाघमारे आणि त्यांचे पथक घटनास्थळी पाठवले.