जिल्ह्यात ३२ नवी आधार केंद्रे सुरू होणार
जळगाव (प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील २५ महसूल मंडळे आणि ७ शहरी भागांमध्ये नवीन आधार केंद्र सुरू करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालयाने अर्ज मागवले आहेत. इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी २ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी केले आहे.
सध्या ज्या महसूल मंडळांमध्ये आधार केंद्र नाहीत, अशा भागांमध्ये आधार केंद्र सुरू होणार आहेत. इच्छुक अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.jalgaon.gov.in वरून अर्जाचा नमुना, पात्रता निकष, रिक्त महसूल मंडळांची नावे आणि आवश्यक माहिती घ्यावी. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे https://forms.gle/Bn1s4filH1SDDQB97 या गुगल लिंकवर २ एप्रिलपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवावीत.