एटीएममधून मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांचे शुल्क वाढले

0
17

एटीएममधून मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांचे शुल्क वाढले

मुंबई ( प्रतिनिधी)-

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज फी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे १ मे २०२५ पासून ग्राहकांना आता एटीएममधून त्यांच्या बँकेच्या मोफत व्यवहार मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क प्रत्येक व्यवहारावर १९ रुपये शुल्क लागू होईल

हे शुल्क पूर्वी १७ रुपये होते. खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी आता ७ रुपये आकारले जातील, जे आधी ६ रुपये होते.

एटीएम इंटरचेंज फी म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला एटीएम सेवा पुरवण्यासाठी दिले जाणारे शुल्क. हे शुल्क सहसा ग्राहकांकडून त्यांच्या बँकिंग खर्चाचा भाग म्हणून वसूल केले जाते. मेट्रो शहरांमध्ये: ग्राहकांना दरमहा ५ मोफत व्यवहार करता येतात,नॉन-मेट्रो शहरांमध्ये: दरमहा ३ मोफत व्यवहार करण्याची परवानगी आहे,

डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे रोख व्यवहारांमध्ये घट झाली आहे. ग्राहकांना रोख रक्कम काढण्याची गरज कमी वाटू लागली आहे.

लहान बँकांच्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहारांचा झपाट्याने विस्तार होत असल्याने एटीएम व्यवहारांकडे ग्राहकांचा कल कमी होत आहे. डिजिटल व्यवहारांचा अधिक वापर करून हे अतिरिक्त शुल्क टाळता येऊ शकते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here