सहाशे रूपयांत अभियंत्यासह तिघांना प्लंबरने एसीबीशी जोडले ! भुसावळ प्रतिनिधी प्लंबर परवान्याच्या नूतनीकरणासाठी सातशे रूपयांची लाच मागून तडजोडीवर सहाशे रूपये स्वीकारण्याचा मोह भुसावळ नगरपालिकेच्या पाणी पुरवठा अभियंत्यासह लिपीक व कंत्राटी कर्मचाऱ्याला भोवला त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील एका प्लंबरचा परवाना संपल्याने नूतनीकरणासाठी ते नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात गेले होते. येथे कंत्राटी कर्मचारी शाम साबळे याने त्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्याने पाणी पुरवठा अभियंता सतीश देशमुख यांना कॉल केला त्यांनी या कामासाठी सातशे रूपये लागतील असे सांगितले. यावर सहाशे रूपये देण्याचे पंचाच्या समक्ष ठरले. दरम्यान, साबळे यांनी पाणी पुरवठा विभागातील लिपीक शांताराम सुरवाडे…
Author: Vikas Patil
जनार्दन बंगाळे यांचा राज्यस्तरीय गौरव जळगाव ( प्रतिनिधी ) – राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2023-24 अंतर्गत रावेर तालुक्यातील खिरोदा प्र. येथील मंडळ अधिकारी जनार्दन दत्तात्रय बंगाळे यांना ‘दाखल्यांची शाळा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा गौरव प्रदान करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती. “दाखल्यांची शाळा” ही संकल्पना ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावेत यासाठी राबविण्यात आली. या उपक्रमामुळे शासकीय कार्यालयांची प्रतिमा जनमानसात सकारात्मक झाली नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक…
चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे संस्कृत परीक्षांमध्ये यश रावेर (प्रतिनिधी) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापिठाच्या २०२४- २५ मधील परीक्षेतील प्राज्ञ, विशारद, शास्त्री या वर्षाचे निकाल जाहीर झाले आहे. फैज़पुर येथील श्री चक्रधर गुरुकुल विद्याप्रसारक मंडल संचालित श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचा निकाल ८० टक्के लागला आहे. २०२४- २५ या वर्षात ११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. प्राज्ञमध्ये शिकत असलेला विद्यार्थी कन्हया कोठी व विशारदमध्ये शीतल भोजने व शास्त्रीमध्ये निकिता वायंदेशकर यांनी विशेष प्राविण्य मिळवत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्रीचक्रधर गुरुकुल विद्याप्रसारक मंडलाच्या वतीने अध्यक्ष वसंत विश्वनाथ महाजन यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्कृत ही भाषा केवळ शैक्षणिक विषय…
मुलाचा वाढदिवस साजरा करून गावी परतणाऱ्या बापाचा रेल्वे अपघातात मृत्यू रावेर ( प्रतिनिधी ) – भामर्डी (ता. धरणगांव) येथील ३० वर्षीय विवाहित पुरुषाचा मृतदेह दि.२२ रोजी सकाळी रायपुर पाटचारीनजीक रेल्वे रुळावर मिळून आला सावदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भामर्डी येथील कमलेश ज्ञानेश्वर पाटील (वय – ३०) हा विवाहित तरुण दि.१९ रोजी मुंबईहून धरणगाव येण्यासाठी रेल्वेने निघाला होता. त्याच दिवशी त्याने त्याच्या काकाला कॉल करून, झोप लागल्याने गाडी भुसावळहून पुढे निघाली असे कळविले. त्यांनी सावदा येथे उतरून भुसावळला येण्याची माहिती दिली होती. त्यानंतर मात्र त्याचा संपर्क होत नव्हता, नातेवाईक त्याचा शोध घेत असतांना दि. २२ रोजी त्याचा…
जिल्ह्यात ७५ गावांमधील २९६ जल पुनर्भरणाच्या कामांना मंजूरी जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील दिवसेंदिवस घटत चाललेली भूजल पातळी, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल पुनर्भरणा करिता जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मिशन संजीवनी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ७५ गावांमधील २९६ जल पुनर्भरणाच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. वाढते तापमान, वाढते काँक्रिटीकरण यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळी घटत आहे. भूजल पातळीत होणारी घट चिंतेचा विषय असून भीषण पाणीटंचाई ला तोंड द्यावे लागत आहे. भूजल पातळीत होणारी घट भरून काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेने मिशन संजीवनी अभियान सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्हाभरात जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या विविध इमारत…
डॉ. नि. तु. पाटील यांचा ३० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम जळगाव (प्रतिनिधी)- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील यांनी ३० हजार यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा विक्रम केला आहे. भुसावळसारख्या शहरात त्यांनी हे यश संपादन केले आहे. डॉ. पाटील यांनी सांगितले की, त्यांनी एमबीबीएसनंतर डीओएमएस केले. पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया २००५ मध्ये झाली. नंतर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये सेवा दिली. जे.जे. रुग्णालयात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यभरातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या अनुभवातून कौशल्ये आत्मसात केली. जळगावमध्ये नेत्रज्योती हॉस्पिटल आणि नेत्रम हॉस्पिटलमध्येही नेत्रसेवा दिली. १ मे २०११ रोजी डॉ. उल्हास पाटील मेडिकल…
दुकानदाराचीच उतरविली ! ; १० लाखांच्या दारूसह ७० हजार लंपास जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील इच्छादेवी चौकात २३ एप्रिलरोजी पहाटे मद्य विक्रीच्या दुकानावर चोरांनी डल्ला मारला अज्ञात चोरट्यांनी अशोका लिकर गॅलरी या दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील ७० हजार रुपयांसह १० लाख रुपये किंमतीच्या देशी आणि विदेशी दारूचे १२६ बॉक्स चोरून नेले. भुसावळचे अशोकशेठ नागराणी यांचे इच्छादेवी चौफुली परिसरात महामार्गालगत अशोका लिकर गॅलरी दुकान आहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवून काउंटरमधील ७० हजार रुपयांची रोकड आणि विविध प्रकारच्या महागड्या दारूचे बॉक्स लंपास केले. चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) देखील चोरून नेला. उपविभागीय…
कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्षाची स्थापना जळगाव (प्रतिनिधी)- खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांची उपलब्धता व गुणवत्तेबाबत येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा परिषदेने कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंदणी करून त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील कृषीविषयक समस्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे सुलभ होणार आहे. तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची नावे, पद आणि संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा परिषदेत विजय पवार (मोहीम अधिकारी- ९४२३४८२२७४), राहुल महाजन (कृषी अधिकारी- ९६०४८४९४४४) आणि अभिमान माळी (जिल्हा कृषी अधिकारी (सा.)- ९४२२२३५८१३) हे अधिकारी कार्यरत आहेत.…
मुक्ताईनगरच्या समर्थ वंजारीला ‘बाल वैज्ञानिक’ पुरस्कार मुक्ताईनगर ( प्रतिनिधी)- मुक्ताईनगरच्या श्री समर्थ सायन्स क्लासेस व निळे कोचिंग अकॅडमीचा विद्यार्थी समर्थ शिवाजीराव वंजारी याने होमीभाभा फाउंडेशन (मुंबई) व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावून ‘बाल वैज्ञानिक’ पुरस्कार प्राप्त केला आहे. समर्थ वंजारी २२ एप्रिलरोजी इस्त्रोच्या श्रीहरीकोटा येथील मुख्य केंद्रावर पोहोचला. त्याला उपग्रह संशोधन, अंतराळ उड्डाण, अवकाश विज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव व मार्गदर्शन मिळणार आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या २० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुक्ताईनगरचा प्रतिनिधी म्हणून समर्थची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यात समर्थने सातवीतून तृतीय क्रमांक मिळवून…
जळगावात सोने तोळ्यामागे २३६९ रुपयांनी उतरले जळगाव (प्रतिनिधी)- लाखापुढे सोन्याचे दर गेल्याने निराश ग्राहकांना बुधवारी सकाळी दिलासा मिळाला. शहरात मंगळवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी सकाळी बाजार उघडताच २३६९ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९९ हजार ६०१ रुपयांपर्यंत घसरले. जळगावमध्ये गुढीपाडव्यानंतर सोन्याचे दर उच्चांकी ९४ हजार ३४८ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यानंतर सुरू झालेली घसरण पुढील काही दिवस कायम राहिल्याने सोने ९१ हजार ४६४ रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, नऊ एप्रिलला पुन्हा उसळी घेतलेल्या सोन्याचे दर प्रतितोळा ९२ हजार ७०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दरवाढीत सातत्य राहिल्याने २२ एप्रिलपर्यंत सोन्याचे दर…