आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांमधील भीती केली कमी साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांच्या आदेशावरून तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल देसले, डॉ.कांचन गायकवाड, तालुका मलेरिया सुपरवायझर अण्णा जाधव यांच्या सूचनेनुसार नेरी येथील प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकामार्फत डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. जामनेर तालुक्यातील नेरी दिगर, मोहाडी, मोरगाव याठिकाणी डॉ.कोमल देसले यांनी स्वतः भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेऊन डेंग्यूबद्दल लोकांना माहिती देऊन जनजागृती केली. तसेच गावामध्ये गप्पी मासे कंटेनर सर्व्हे करून लोकांमध्ये डेंग्यू आजाराबद्दल असलेली भीती कमी करण्याचे काम नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले. डेंग्यू दिवस जागृतीसाठी डॉ.गिरीश पाटील,…
Author: Sharad Bhalerao
अवकाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची स्थिती साईमत/जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यात बहुतांश ठिकाणी वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच केळीची लागवड करणारे शेतकरी सुखावले आहेत. कारण बहुतांश शेतकऱ्यांचे पाणी कमी पडू लागल्याने केळी बागा करपू लागल्या होत्या. मात्र, अचानक झालेल्या पावसाने करपणाऱ्या केळींना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच परिसरात रब्बीची लागवड शेतकऱ्यांनी उशिरा केल्यामुळे मका हे मुख्य पीक व कांदाचे बी उभे होते. मात्र, वादळी पावसाने बऱ्याच प्रमाणात त्याचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था झाली आहे. तसेच परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडांनाही फटका बसला आहे. बऱ्याच झाडावरील आंबे पडल्याने त्याठिकाणी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांंचे…
घरासमोर साचू लागले पाण्याचे डबके : रहिवाशांमधून संताप साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पिंप्राळा शिवारातील सावखेडा रस्त्यावरील सोनी नगरमध्ये दोन गल्लीत रस्त्यांची कामे झाली. मात्र, धनंजय सोनार यांच्या घरापासून ते स्वयंभू महादेव मंदिर परिसरात रस्ते अर्धवट सोडून दिल्याने पहिल्याच अवकाळी पावसामुळे रहिवाश्यांच्या घरासमोर पाण्याचे डबके साचू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. अशा डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होऊन लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने सोनी नगरातील रहिवाश्यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात आ.राजू मामा भोळे यांना नागरिकांनी भेटून आपबीती कथन केल्यावर आमदारांनी परिसरात पर्याय म्हणून मुरूमचा भराव करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, ऐन अवकाळी पाऊस पडल्याने…
नशिराबाद पोलिसात बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील महामार्गावर भरधाव बसने ओमनीला जोरदार धडक देवून नुकसान केल्याची घटना गुरूवारी, १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. सुदैवाने वाहनातील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील माऊली पेट्रोल पंपाजवळ प्रवाशी चारचाकी वाहन ओमनी (क्र.एमएच १५ डीएम ६९५०) उभी होती. १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव ते भुसावळ जाणारी बसवरील (क्र.एमएच ०६ एस ८५३४) चालक विजय शिवाजी पाटील (रा. खेडी, ता.जि.जळगाव) याने अंमली पदार्थ सेवन करून वाहन हयगयीने चालवून ओमनीला जोरदार धडक दिली. त्यात तिचे नुकसान झाले…
एमआयडीसी पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील जे.के.पार्क परिसरात अवैधपणे गांजाचा नशा करणाऱ्या दोन जणांवर एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी, १५ मे रोजी दुपारी ४ वाजता कारवाई केली आहे. त्यांच्याकडून नशा करण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, जळगाव शहरातील जे.के.पार्क परिसरात काहीजण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १५ मे रोजी दुपारी ४ वाजता कारवाई करत आसीफ खान आलीयान खान (वय ४२) आणि शेख मेहेमुद शेख महेबुब (वय ५३, दोन्ही राहणार तांबापूरा, जळगाव) यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून गांजा आणि साहित्य जप्त केले…
विद्यार्थीभिमुख विविध उपक्रम राबवत करताहेत अध्यापन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील लेवा एज्युकेशनल युनियन संचलित डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कला आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्यपदी मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. जळगाव शहरातील बेंडाळे महिला महाविद्यालयाला नॅकने ‘अ’ श्रेणी देऊन सन्मानित केले आहे. अशा महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सत्यजित साळवे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते गेल्या १५ वर्षापासून सेवेत आहेत. त्यांनी विद्यार्थीभिमुख विविध उपक्रम राबवित अध्यापन आणि अभ्यासेतर पुरक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करतात. महाराष्ट्र शासनाने लोककलेच्या सर्वेक्षण व अभ्यासाचा १० लाखांचा दीर्घ संशोधन प्रकल्प पूर्ण केलेला आहे. तसेच ते विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक आहेत.…
जळगाव एलसीबीची कामगिरी, चोरट्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील एमआयडीसी परिसरातील एका लॉन्सवर गेल्या ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या एका लग्न समारंभात ८५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅम सोन्याची चैन चोरट्याने गोड बोलून लांबविली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, मेहरूण येथील एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास करत अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही चोरी अनिल विजय हरताडे (वय ३०, रा. लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल, जळगाव) याने केली असल्याची माहिती एलसीबीला तपासातून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला जळगाव शहरातून ताब्यात घेतले.…
प्रतिष्ठाने साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून घेतली कार्याची दखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील कांचन नगरातील रहिवासी, कवी तथा लेखक गोविंद देवरे यांना भगीरथ इंग्लिश स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन समाज चिंतामणी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी आर.डी.कोळी, कवी जयसिंग वाघ, पूर्व शिक्षा अधिकारी नीलकंठ गायकवाड, डी.बी.महाजन, भास्कर चव्हाण, श्री.बडगुजर यांच्यासह समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. साहित्य विकास मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष गोविंद देवरे सुरुवातीला काही काळ अण्णाभाऊ साठे यांच्या सान्निध्यात राहिले होते. जळगावच्या साहित्यिक आंदोलनात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. तसेच महाकवी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची…
जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील घटना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष क्रमांक १२ येथे एका परिचारिकेचा विनयभंग करून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार १२ मे रोजी घडला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हाभरातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. याठिकाणी कक्ष क्रमांक १२ येथे संजय अनिल भोई (रा. एरंडोल) याचा अपघात झाल्याने तो कक्षात उपचार घेत आहे. १२ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास फिर्यादी परिचारिका ह्या कर्तव्यावर होत्या. तेव्हा संशयित आरोपी गोलू वंजारी (रा. एरंडोल) याने परिचारिकेजवळ येऊन, त्यांना लज्जा उत्पन्न…
नशिराबाद पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील भादली येथे वृध्द महिलेच्या सुनेला अश्लिल इशारा केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत वृध्द महिलेला चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना बुधवारी, १४ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील भादलीत लताबाई पुंडलिक कोळी (वय ६०) ही वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ मे रोजी सकाळी ९ वाजता वृद्ध महिलेची सुन घरी असतांना गल्लीत राहणारा सोनू कोळी याने अश्लिल इशारा केला. तेव्हा त्याचा जाब लताबाई कोळी यांनी विचारला. त्याचा राग आल्याने प्रकाश कोळी, मीराबाई…