मागण्या त्वरित पूर्ण करा, आंदोलकांच्या विविध घोषणांनी वेधले लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कृषी विभागातील कृषी सहाय्यकांनी त्यांच्या प्रलंबित आणि विविध मागण्यांसाठी सोमवारी, १९ मे रोजी जिल्हा कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. वेळोवेळी पाठपुरावा करूनही कृषी सहाय्यकांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आपल्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अन्यथा नाइलाजास्तव कृषी सहाय्यक संघटनेच्यावतीने टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन कृषी सहाय्यकांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी कृषी सहाय्यकांनी आंदोलन पुकारले होते. त्यावेळी शासनाने पंधरा दिवसात मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कृषी…
Author: Sharad Bhalerao
एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील विठ्ठलपेठ परिसरातील रहिवासी हिरालाल नारायण चौधरी (वय ५२) यांनी शुक्रवारी, १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात गळफास घेऊन ‘जीवनयात्रा’ संपविली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. एका खासगी कंपनीत हिरालाल चौधरी हे काम करत होते. ते पत्नी, एक मुलगा व एक मुलीसह विठ्ठलपेठ येथे वास्तव्यास होते. ते १४ मे रोजी घरातून अचानक निघून गेले होते. त्यांनी १५ मे रोजी आपल्या बहिणीला फोन करून, “मी येणार नाही, घरी लक्ष ठेव,” असे सांगितले होते.…
उत्तर महाराष्ट्रातून एकमेव गौरव, अनेक निकषांवर आधारित निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतीय संसदेतील उत्कृष्ट कार्यक्षमतेच्या सन्मानार्थ दिल्या जाणाऱ्या ‘संसद रत्न पुरस्कार २०२५’ ची घोषणा केली आहे. यावर्षी महाराष्ट्रातील सात खासदारांचा सन्मान घोषित झाला आहे. या यादीत उत्तर महाराष्ट्रातून केवळ एकमेव जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांची निवड होणे, ही जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. ‘संसद रत्न’ पुरस्कार हा भारतीय लोकशाहीतील सर्वोत्तम संसदीय कार्यगौरव मानला जातो. हा पुरस्कार लोकसभेतील प्रश्न विचारणे, चर्चेत सक्रीय सहभाग, खासगी विधेयक मांडणे, लोकहिताच्या विषयांवर सतत आवाज उठवणे आदी अनेक निकषांवर आधारित निवड प्रक्रियेद्वारे दिला जातो. पुरस्काराची संकल्पना ‘गांधी विचार मंच’ व राजकीय विश्लेषक…
अज्ञात डंपर चालक अद्यापही फरार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील नशिराबाद येथील राणे हॉटेल समोर भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला होता तर इतर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, अखेर याप्रकरणी शनिवारी, १७ मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात डंपरचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील रहिवासी तेजस सुनील बिऱ्हाडे हा तरुण त्याचा भाऊ तुषार सुनील बिऱ्हाडे आणि त्याचा मित्र अजय अफलातून सपकाळे यांच्यासोबत गुरुवारी, १५ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नशिराबादकडून जळगावकडे दुचाकीने (क्र.एमएच १९ इएच ७११८) येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (क्र.एमएच ०८ एपी ०७३५) त्यांच्या दुचाकीला…
एमआयडीसी पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरापासून जवळील कुसुंबा शिवार परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोनू बारेला (वय ४५, मूळ रा. शिरवेल महादेव, जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु. कुसुंबा शिवार) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात १५ मे रोजी गोशाळेसमोर घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, मध्यप्रदेशातील रहिवासी सोनू बारेला हे कुसुंबा शिवारातील एका शेतात वास्तव्यास होते. ते १५ मे रोजी पायी जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून…
दोघांना लोखंडी पाईपने मारहाण, एमआयडीसी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : इंस्टाग्रामवर मुलीसोबत चॅटिंग केल्याचा जाब विचारण्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या मित्राला ४ जणांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी, १७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, अनमोल घनश्यामदास मंधवाणी (वय २८, रा.आदर्श नगर, जळगाव) हा १७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मित्र रोहित अशोक मंथान (रा. बाबा नगर, सिंधी कॉलनी) याच्यासोबत बाबानगर येथे शाळेसमोर आला होता. त्यावेळी इंस्टाग्रामवर मुलीसोबत चॅटिंग करण्याचा जाब विचारलच्या कारणावरून मयूर जावळे, विशाल बाबा, राज जावळे…
वराडे परिवाराने वृक्षारोपणासह समाजबांधवांना दिली ग्रंथाची भेट साईमत/जामनेर/प्रतिनिधी : सत्यशोधक समाजाचे प्रचारक, जळगाव जिल्हा सचिव तथा जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील रहिवासी रमेश वराडे यांचे वडील माजी ग्रा.पं.सदस्य शेनफडू तुकाराम वराडे हे गेल्या २ मे रोजी निसर्गात विलीन झाले. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यशोधक पद्धतीने त्यांचा दशक्रिया विधी आणि गंधमुक्तीचा कार्यक्रम त्यांचा मुलगा रमेश यांनी स्वत: सर्व महापुरुषांच्या पूजनासह कुलदैवत पूजन करून नुकताच टाकळी खुर्द येथे पार पडला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लाल चंदन, निंब आदी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित समाज बांधवांना महात्मा फुले लिखित विधीचे ग्रंथ भेट देण्यात आले. कार्यक्रमात आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट देण्याचा…
जामनेरात माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते प्रकाशन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : राज्याचे मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी, १७ मे रोजी त्यांच्या निवासस्थानी दैनिक ‘साईमतच्या’ अभीष्टचिंतन विशेष पुरवणीचे प्रकाशन माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संपादक प्रमोद बऱ्हाटे, कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, वृत्त संपादक छगनसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दै.‘साईमतची’ अभीष्टचिंतन विशेष पुरवणी वाचनीय ठरली असल्याच्या प्रतिक्रिया असंख्य उपस्थित मान्यवरांनी दिल्या आहेत. मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांचा लेखा-जोखा, मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया तसेच उत्कृष्ट मांडणी असलेल्या दैनिक ‘साईमतच्या’ अभीष्टचिंतन विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमोद बऱ्हाटे, सुरेश उज्जैनवाल, छगनसिंग पाटील यांनी मंत्री ना.…
रोकडसह दागिन्यांचा समावेश, चौघा चोरट्यांपैकी एकाला अटक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव रेल्वे स्थानकात कर्नाटक एक्सप्रेसमधून उतरताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतून २ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना १५ मे रोजी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू करत मनमाडला एका चोरट्याला अटक केली तर अन्य तीन चोरटे फरार असल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, लक्ष्मी विशाल अग्रवाल (वय ४०, रा. खंडवा, मध्यप्रदेश) ह्या मुलगी अवनी आणि मुलगा समर्थ यांच्यासह खंडव्याहून जळगावला येत होत्या. मुलीच्या बारावीच्या यशानिमित्त सोन्याचे टॉप घेण्यासाठी त्यांनी रोख रक्कम आणि सोन्याच्या बांगड्या बॅगेत ठेवल्या…
प्रतिष्ठानने शैक्षणिक क्षेत्रातील योगदान पाहून कार्याची घेतली दखल साईमत/जामनेर/प्रतिनिधी : येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, ज्येष्ठ कवी-साहित्यिक, समाजसेवक डी. डी. पाटील यांना भगीरथ इंग्लिश स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देऊन ‘समाज चिंतामणी’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी आर.डी.कोळी, कवी जयसिंग वाघ, पूर्व शिक्षा अधिकारी नीलकंठ गायकवाड, डी.बी.महाजन, भास्कर चव्हाण, श्री.बडगुजर यांच्यासह समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. गेल्या पंधरा वर्षापासून डी. डी. पाटील हे जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा गेल्या १३ एप्रिलला ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. गिरीश महाजन…