Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»Guidance on Mahatma Phule’s : टाकळी खुर्दला महात्मा फुलेंच्या सत्यशोधक पध्दतीविषयी मार्गदर्शन
    जामनेर

    Guidance on Mahatma Phule’s : टाकळी खुर्दला महात्मा फुलेंच्या सत्यशोधक पध्दतीविषयी मार्गदर्शन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 18, 2025Updated:May 18, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वराडे परिवाराने वृक्षारोपणासह समाजबांधवांना दिली ग्रंथाची भेट

    साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

    सत्यशोधक समाजाचे प्रचारक, जळगाव जिल्हा सचिव तथा जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील रहिवासी रमेश वराडे यांचे वडील माजी ग्रा.पं.सदस्य शेनफडू तुकाराम वराडे हे गेल्या २ मे रोजी निसर्गात विलीन झाले. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यशोधक पद्धतीने त्यांचा दशक्रिया विधी आणि गंधमुक्तीचा कार्यक्रम त्यांचा मुलगा रमेश यांनी स्वत: सर्व महापुरुषांच्या पूजनासह कुलदैवत पूजन करून नुकताच टाकळी खुर्द येथे पार पडला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लाल चंदन, निंब आदी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित समाज बांधवांना महात्मा फुले लिखित विधीचे ग्रंथ भेट देण्यात आले.

    कार्यक्रमात आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट देण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच रात्री सर्व गावासाठी ‘सत्यशोधक’ हा चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपट पाहण्यासाठी शेकडो समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जिल्हा संघटक कैलास महाजन यांनी सत्यशोधक विधी स्वतः का करायचा, याविषयी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

    यांच्याकडून मिळाली प्रेरणा

    कार्यक्रमाची प्रेरणा सत्यशोधक समाजाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे, जिल्हाध्यक्ष पी.डी.पाटील, सांस्कृतिक संघाचे राज्य प्रभारी भगवान रोकडे यांच्याकडून मिळाली.

    यांची होती उपस्थिती

    कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रवींद्र तीतरे, सत्यशोधक समाजाचे प्रचारक पवन माळी, योगेश कोलते, क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष प्रा.उत्तम पवार, मुकुंदा माळी, योगेश झाल्टे, अरूण रोकडे, अरुण पाटील, माजी सरपंच समाधान वराडे, सारंगधर अहिरे, मंगलदास अहिरे, बाळू चवरे, संतोष माळी, संजय माळी, दीपक माळी, विरेंद्र अहिरे, सुभाष जगताप, शिवदास महाजन यांच्यासह बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jamner : सामरोद येथे तीन ठिकाणी धाडसी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

    January 10, 2026

    Jamner:जामनेर तलाठ्याचा रंगेहात लाचगिरीचा फटका–४ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला

    January 7, 2026

    Jamner:डंपरच्या धडकेत तरुण ठार;

    January 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.