पुणे येथे आयोजित प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार वितरणप्रसंगी प्रतिपादन साईमत/पुणे/प्रतिनिधी : मराठी समीक्षेत बालसाहित्याची ‘समीक्षा’ ही नेहमीच उपेक्षित आहे. आजही ती तुरळक स्वरूपात दिसून येत असल्याचे प्रतिपादन ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्काराचे शनिवारी, ७ जून रोजी वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह डॉ. वि. दा. पिंगळे होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेचे समन्वयक प्रा. डॉ. वासुदेव…
Author: Sharad Bhalerao
पुतळ्याचे केले दहन, कोर्ट चौकात आंदोलन करुन केली घोषणाबाजी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केले होते. खासदार संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा भाजपतर्फे शुक्रवारी, ६ जून रोजी त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे कोर्ट चौकात संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच भाजपाच्या जळगाव जिल्हा महानगराच्यावतीने खा. संजय राऊत यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. आ. सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा कार्यालयातून कोर्ट चौकात मोर्चा नेण्यात आला. यावेळी खा. राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोर्ट चौकात आल्यावर संजय राऊत यांच्या पुतळ्याला…
रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भरधाव कंटेनरने दुचाकीला कट मारल्याने दुचाकी घसरली होती. त्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात बुधवारी, ४ जून रोजी रात्री महामार्गावरील शिव कॉलनीजवळ घडला. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. रोहित श्रीराम बारी (वय ३०, रा. हरिविठ्ठल नगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील फुले मार्केटमध्ये कापडाचा व्यवसाय करणारे रोहित बारी बुधवारी रात्री दुचाकीने (क्र.एमएच १९, डीके २७९०) घरी जात होते. मागून येणाऱ्या कंटेनरने (क्र.एमएच १९, सीएक्स २२५९) दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकी घसरली. त्यात रोहित हा खाली पडला. खाली पडल्यामुळे त्याच्या पोटाला, डाव्या पायाला, कंबरेला…
निवडीत डॉ. प्रदीप जोशी, प्रा.डी.एस.कट्यारे, विश्वजीत चौधरी यांचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित तीन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नुकतीच पार पडली. बैठकीत २०२५-२८ अशा तीन वर्षासाठी राज्य कार्यकारिणीची निवड प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडली. त्यात जळगाव जिल्ह्यातील तीन कार्यकर्त्यांची राज्याच्या कार्यकारिणीत नियुक्ती केली आहे. नूतन कार्यकारिणीत जळगावचे प्रा. डिगंबर कट्यारे यांची वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य कार्यवाह म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांचीही राज्याच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाच्या राज्य कार्यवाहपदी फेरनिवड केली आहे तर जळगावचे विश्वजीत चौधरी यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन निवड सहमती समितीने त्यांची राज्याच्या…
नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर स्वीकारला पदभार साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील करगाव येथील लोकनेते काकासाहेब जी.जी.चव्हाण माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकपदी कवी मनोहर नामदेव आंधळे यांना १ जून २०२५ रोजी सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जी.जी.चव्हाण, चिटणीस राजेश वाडीलाल राठोड यांच्या स्वाक्षरीनिशी नियुक्ती आदेश देऊन श्री.आंधळे यांनी पदभार स्वीकारला आहे. नियत वयोमानानुसार ३१ मे २०२५ रोजी मुख्याध्यापक बिलाल सकावत शेख हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी संस्थेतील सेवा ज्येष्ठतेनुसार १ जूनपासून मनोहर आंधळे यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करून त्यांना हा पदभार सोपविला आहे. यांनी केले कौतुक याबद्दल सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जी.जी.चव्हाण, उपाध्यक्ष मच्छिंद्र राठोड, चिटणीस राजेश राठोड, संचालक योगेश सुभाष चव्हाण…
जळगावात मराठी प्रतिष्ठान, गुड ग्राउंड वेल्फेअरने राबविला स्तुत्य उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील मराठी प्रतिष्ठान आणि गुड ग्राउंड वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या वृक्षारोपणाच्या उपक्रमात केवळ नुसती झाडे लावण्यात आली नाहीत तर पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेऊन एक सशक्त आणि भावनिक क्षण अनुभवण्यात आला. ‘जबाबदारीचे भान आणि हरित भविष्यासाठी वचन’ असा स्तुत्य उपक्रम आयोजकांनी राबविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमात तरुण-तरुणी, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी सहभागी झाले होते. हा उपक्रम एक सामाजिक शपथविधीच ठरला. जिथे वृक्षारोपणासोबत पर्यावरण रक्षणाची वैयक्तिक व सार्वजनिक बांधिलकी निर्माण झाल्याचे दिसून आले. वृक्षसंवर्धन नोंद ठेवण्याची तयार केली योजना प्रत्येक व्यक्तीने स्वतः झाड लावले आणि…
पक्षाकडून ३८ वर्षाच्या खडतर प्रवासाची मिळाली पावती साईमत/जळगाव/धरणगाव/प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसंदर्भात चार उपनेत्यांच्या नियुक्त्यांची नुकतीच घोषणा केली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात चौघांच्या नियुक्त्यांबाबत माहिती दिली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातून धरणगावचे रहिवासी तथा विद्यमान जळगाव जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांचाही समावेश आहे. तसेच त्यांच्यावर उपनेते पदाबरोबरच रावेर लोकसभा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. १९८४ मध्ये दहावी पास झाल्यावर त्यांनी धरणगाव येथे कला आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी सेनेची शाखा काढली. त्यांनी विद्यार्थी दशेत असतानाच शिवसेनेत उडी घेतली होती. शिवसैनिक ते शिवसेनेचा उपनेता असा त्यांनी ३८ वर्षे निष्ठेने पक्षाचा खडतर…
मनपाने त्वरित दखल घेण्याची गरज : नागरिक आले दहशतीखाली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगर ते सावखेडा रस्त्यावर विद्युत खांब आहे. पण पथदिव्यांअभावी रात्री वयोवृद्ध,महिला यांना अंधारातून पायदळ जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील कुत्रे अंगावर धावून येत आहे. त्यामुळे नागरिक दहशतीखाली आले आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे. शहरातील पांडुरंग साई नगर जवळील रस्त्यावर मासे विक्री केली जाते. त्यातील काही विक्रेते उरलेले किंवा खराब झालेले मासे आणि त्याचे अवशेष सर्रासपणे रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत उघड्यावर टाकून देतात. त्यामुळे अस्वच्छता तर वाढतेच पण परिसरात कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढतो.…
राष्ट्रजागृती वारकरी परिषदेतर्फे स्पर्धेचे आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : संत कबीर जयंती आणि आषाढी वारी पर्वानिमित्त राष्ट्रजागृती वारकरी परिषदेतर्फे जिल्हास्तरीय हरिपाठ , निरूपण स्पर्धेचे बुधवारी, ११ जून रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजन केले आहे. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा त्यानंतर सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण तसेच सामूहिक पसायदानाने स्पर्धेची सांगता करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय समाज प्रबोधनकार ॲड. माईसाहेब महाराज पाटील यांनी सांगितले. वारकरी संत तत्वाचा प्रचार व प्रसार करणे तसेच हरीपाठाची संस्कृती शहरी भागात पसरविणे आणि भक्ती, प्रगल्भता, सत्य, संत चरित्र प्रसारित करणे असा स्पर्धेचा उद्देश असणार आहे. स्पर्धेचे नियम व अटी लागू केले आहे. सामूहिक हरिपाठ सादर…
जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्रलंबित मागणी मान्य साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ८० गावांच्या पाणी पुरवठा योजनेवर कार्यरत ६८ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याची मागणी प्रलंबित होती. अशा प्रलंबित मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ मीनल करनवाल यांनी मागणी मान्य केल्याचे सांगण्यात आले. सातव्या वेतन आयोगाचा लाभ ६८ कर्मचाऱ्यांना निर्णयाअंतर्गत लेखी आदेशाद्वारे प्रदान केला आहे. अशा लाभार्थी कर्मचाऱ्यांमध्ये कार्यरत कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच दिवंगत कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. लाभ मंजूर केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये १७ दिवंगत कर्मचारी यांचा सहभाग आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभात होणार वाढ कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांना हा निर्णय…