फ्लोरेन्स नाईंटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुजाता बागुल यांचा सत्कार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : दै. ‘साईमत’ने म्हणजे माध्यम जगताने फ्लोरेन्स नाईंटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुजाता बागुल यांच्या कर्तृत्वाची घेतलेली दखल समाजातील सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्याची पाऊलवाट प्रशस्त करण्यासारखी ठरली आहे. त्यामुळेच माझ्या दृष्टीने हा सत्कार म्हणजे ‘लाखमोलाचा’ असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते एमआयडीसीतील ‘साईमत’च्या मुख्य कार्यालयातील सभागृहात मंगळवारी, १० जून रोजी सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सुजाता बागुल यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छासह साडी चोळी देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, व्यवस्थापक सुनील अहिरे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे, मुस्लिम…
Author: Sharad Bhalerao
प्रभात कॉलनीत जळगाव एसीबीची कारवाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचा बहाणा करत वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणमधील एका कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७, रा. जळगाव) (कंत्राटी वायरमन, नेमणूक प्रभात कॉलनी कक्ष) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. जळगाव येथील ४६ वर्षीय तक्रारदारांच्या घराचे वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावावर होते. महावितरणकडून वीज मीटर बदलण्याचे काम सुरू असताना तीन दिवसांपूर्वी वायरमन भूषण चौधरी…
शनीपेठ पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील इस्लामपुरा भागात अवैधपणे गोमांसची विक्री करणाऱ्यांवर शनीपेठ पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी कारवाईसाठी आलेल्या महिला पोलीस निरीक्षकांच्या अंगावर धावून येत दोन महिलांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत तीन जणांविरुध्द वेगवेगळ्या कलमान्वये शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इस्लामपुरा भागातील मदिना मशिदजवळ काही जण अवैधपणे गोमांस विक्री करत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्वत: पथकासह सोमवारी, ९ जून रोजी कारवाई केली. त्यावेळी नरगिस रऊफ खान (वय २०), जमीलाबी…
अ.भा. सफाई मजूर संघातर्फे मनपाच्या आयुक्तांना दिले निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक यांच्यासह कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकीची प्रतीक्षा आजही कायम आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. परंतु, फरकाची थकबाकी रक्कम अद्यापही पूर्ण मिळालेली नाही. ही थकबाकी समान पाच हप्त्यांमध्ये देण्याचे आदेश असूनही थकबाकीची प्रतीक्षा कायम आहे. ही उर्वरित थकबाकी दरमहा वेतनात २० समान हप्त्यात समाविष्ट करुन देण्याची मागणी अखिल भारतीय सफाई मजूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय चेंगट यांनी केली आहे. अशा आशयाचे निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले आहे. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता ऑक्टोबर २०२४ (५० टक्के रक्कम) आणि…
वाढीव मोबदला वसुलीसाठी चौघा शेतकऱ्यांचा १० वर्षांचा लढा यशस्वी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पारोळा आणि एरंडोल येथील शेतकऱ्यांची शेती महामार्गाच्या कामात गेल्यामुळे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतीचे दर कमी दिल्याने शेतकऱ्यांचा १० वर्षांपासून वाढीव मोबदला मिळावा म्हणून लढा सुरू होता. आता जळगाव दिवाणी न्यायाधीश एस. एस. घारे यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या विरुद्ध निकाल दिल्यानंतर कार्यालयातील वस्तू जप्तीचे आदेश केले होते. त्यानुसार सोमवारी, ९ जून रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील सर्व साहित्य कार्यालयात जाऊन जप्त केले असल्याचे सांगण्यात आले. ‘नही’ म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरुद्ध बाळासाहेब भास्कर पाटील (रा. पारोळा), सुकलाल भिला महाजन, रुपेश रामा माळी, सुरेश मुकुंदा महाजन (सर्व रा. एरंडोल) यांनी दावा…
मार्केटमध्ये पसरले दहशतीचे वातावरण, वादामुळे व्यापाऱ्यांनी केली दुकाने बंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील गोलाणी मार्केटमध्ये चष्मा घेण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि दुकानदारात वाद उफाळल्याची घटना सोमवारी, ९ जून रोजी दुपारी घडली. हा वाद विकोपाला गेल्यामुळे व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्यास भाग पाडले. अशा सर्व प्रकारामुळे गोलाणी मार्केटमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये दिनेश निलेश चौधरी हा तरुण मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी आला होता. मोबाईल रिपेरिंग झाल्यानंतर तो चष्मा घेण्यासाठी शाहरुख शेख अक्तर या दुकानदाराकडे गेला. दरम्यान, चष्म्याच्या किंमतीवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने व्यापाऱ्यांनी एकामागे एक आपली दुकाने बंद केली. तसेच घटनेत व्यापारी आणि वाद…
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी केली मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड ह्या चार वर्षीय बाळाचा गेल्या १ जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेला मनपा प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच मयताच्या कुटुंबियांना शासनाने २५ लाखाची आर्थिक मदत द्यावी, अशा मागणीसाठी सोमवारी, ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनआंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॉबीला न्याय मिळालाच पाहिजे, असे म्हणत आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मोकाट कुत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मनपा आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे, मनपा प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. नागेश्वर कॉलनीतील अरविंद उर्फ बॉबी…
एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज-लहान मोठ्या घरफोडीच्या घटना घडत आहेत. अशात नातेवाईकांकडे लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी ३७ हजार रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ मे ते ६ जून दरम्यान गायत्री नगरात घडली. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरातील गायत्रीनगरातील ज्योती मेकलकर यांच्या नातेवाईकांकडे लग्न असल्याने त्या लग्न सोहळ्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातून ९ हजार रुपये रोख, ६ हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी, नथ,…
तब्बल ३३ पुरुषांनी केल्या तक्रारी दाखल साईमत/धुळे/प्रतिनिधी : पती व सासरच्यांकडून विवाहितेचा छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, धुळे जिल्ह्यात विवाहित पुरुषांचाही पत्नीकडून छळ होत असल्याचा तक्रारी समोर आल्या आहे. आतापर्यंत तब्बल ३३ पुरुषांनी पत्नीकडून छळ होत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, समाज काय म्हणेल, अशा भीतीने अनेक पुरुष पत्नीचा निमूटपणे छळ सहन करत असल्याचे पीडितांचे मत आहे. विवाहित पती-पत्नीमध्ये अनेक कारणांवरून भांडणे होत असतात. अशा भांडणाचे रूपांतर हाणामारीत होते. त्यानंतर नातेवाईकांचा सहभाग यात होऊन ही प्रकरणे पोलिसांपर्यंत जातात. त्यातून संसारात कलह निर्माण होऊन संसार तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सर्व प्रकरणांवर ‘भरोसा सेल’मध्ये सुनावणी घेऊन…
महिलेची ७३ हजाराची सोन्याची पोत लांबवली, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील कासमवाडीतील आठवडे बाजारातून एका महिलेच्या गळ्यातील ७३ हजाराची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना शनिवारी, ७ जून रोजी घडली होती. याप्रकरणी रविवारी, ८ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरातील महाबळ येथील रहिवाशी येथील जयश्री संजय धरम (वय ३०) ह्या शनिवारी, ७ जून रोजी कासमवाडी येथील आठवडे बाजारात रात्री ८ वाजता खरेदीसाठी आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७३ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अखेर महिलेने एमआयडीसी…