सेंट्रल रेल्वेचे व्यवस्थापक धर्मवीर मीना यांचे आश्वासन साईमत/धुळे/प्रतिनिधी : शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांसाठी धुळे येथून मुंबई आणि पुण्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वेसेवा सुरू करण्यासह मुंबई व पुण्याहूनही रोज रात्री धुळ्यासाठी एसी कोचसह रेल्वेसेवा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी धुळे शहराचे आ.अनुप अग्रवाल यांना दिले. मुंबई येथे सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना, रेल्वेचे प्राधान्य मुख्य अभियंता रजनीश माथूर, पीसीओएम एस. एस. गुप्ता, पीसीसीएम अरविंद मालखेडे, सीपीआरओ स्वप्नील नीला, उपसरव्यवस्थापक के. के. मिश्रा आदी अधिकाऱ्यांची आ.अग्रवाल यांनी भेट घेत त्यांच्याशी धुळे शहराच्या रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी सरव्यवस्थापक मीना यांनी आ.अग्रवाल यांनी…
Author: Sharad Bhalerao
नवापूर नगरपालिका ‘अलर्ट मोडवर’, स्थानिक स्तरावर पक्षविरहित आघाड्या होणार किंवा कसे..? साईमत/नवापूर/प्रतिनिधी : येथील नगर पालिका निवडणूक आता तोंडावर आली आहे. प्रभाग रचना करण्याचे राज्य सरकारने आदेश दिल्याने नवापूर नगरपालिका विषय पुन्हा चर्चेला आला आहे. प्रशासकीय स्तरावर यंत्रणा जागी झाली असून कामाला लागली आहे. आता प्रभाग रचना कशी होते, याकडे नवापूरकरांचे लक्ष लागून राहणार आहे. लगीनघाई आता वेग घेणार आहे. भावी नगरसेवक आता गतीने कामाला लागणार आहे. प्रत्येक प्रभागात वेगवेगळी नावे चर्चेत असून इच्छुक उमेदवारांची जत्रा कुठपर्यंत टिकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या काही महिन्यापासून प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापल्या परीने प्रभागाची सेवा करतांना दिसत आहे तर प्रभागात होणाऱ्या कार्यक्रमात…
एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील एमआयडीसी परिसरातील जय आनंद दाल मिलच्या कंपनीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने बुधवारी, ११ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अजय बुधराम पाटील (वय २२, रा. एमआयडीसी, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मूळचा मध्यप्रदेशातील नेपानगर येथील रहिवासी असलेला अजय पाटील गेल्या तीन वर्षांपासून आपल्या पत्नीसोबत एमआयडीसीतील जय आनंद दाल मिल कंपनीच्या…
वाहन चालक फरार, उमाळा गावात पसरली शोककळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील उमाळा येथील रहिवासी शरद समाधान पाटील (वय अंदाजे ३५) यांचा शेतातून दुचाकीवरून (क्र.एमएच १९ एबी३९१२) घरी परत येत असताना बुधवारी, ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेनंतर गावातील पोलीस पाटील रंगनाथ बिऱ्हाडे, राहुल बिऱ्हाडे यांनी प्रसंगावधान राखून शरद पाटील यांना स्वतःच्या वाहनातून जळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे उमाळा गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, शरद पाटील यांच्या निधनामुळे गावाने एक प्रामाणिक आणि मेहनती युवक गमावला…
जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत कार्य अन् पंचनामे सुरू साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यात बुधवारी, ११ जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. अशा नैसर्गिक आपत्तेमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक भागात घरे, शेती, वीजपुरवठा आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत कार्य आणि पंचनामे सुरू केले असल्याचे सांगण्यात आले. आपत्तीत एरंडोल तालुक्यातील फरकांडे गावातील नारायण सिताराम पाटील (वय ६८) यांच्या घराचे पत्रे लागून मृत्यू तर एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील जगन राहेमाटे (वय ७५) यांच्यावर घराची भिंत कोसळून, जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील रोहिणीबाई बारेला यांच्यावर पत्र्याचे शेड कोसळून मृत्यू झाला. तसेच पाचोरा, यावल व…
नगर विकास विभागाचे प्रभाग रचनेसाठी आयुक्तांना आदेश जारी साईमत/धुळे/प्रतिनिधी : आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने राज्यातील २९ महानगरपालिका तसेच नगरपालिका, नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्याही प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरु होत आहे. यासंदर्भात आयुक्तांना आदेश दिले आहेत. नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांचे लक्ष प्रभाग रचनेकडे लागले आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची धामधुम लवकरच सुरु होणार आहे. त्यात धुळे, जळगाव, नाशिकसह अ, ब, क वर्ग महानगरपालिकात चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांनुसार ‘ड’ वर्गातील १९ महानगरपालिकांचीही प्रभाग रचना करण्यात येणार आहे.…
झाडे उन्मळून पडली, बॅनरही उडाले, वीज खंडित, जळगावातला ‘बजरंग’ बोगदा तुंबला साईमत/जळगाव/चमुकडून : बुधवारी, ११ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानक वादळ, वारा आणि विजेच्या कडकडाडात मृग नक्षत्राच्या पावसाचे शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार आगमन झाले. त्यामुळे जळगाव शहरात बहुतांश ठिकाणी महावितरणने वीज ‘गुल’ केल्याने अंधार पसरला होता. काही झाडे उन्मळून पडली होती. वादळ, वाऱ्यासह विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असल्याने नेहमीप्रमाणे वीज खंडित केली होती. शहरात काही ठिकाणी बॅनरही वादळामुळे पडल्याचे सांगण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात नुकसानीची उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही. जळगावातला ‘बजरंग’ बोगदाही नेहमीप्रमाणे आजच्या पहिल्याच पावसात तुंबला होता. दरम्यान, जामनेर तालुक्यातील पहुरलाही तुरळक पावसाचे आगमन झाल्याचे…
संरक्षण भिंतीसाठी १० लाखांची आ.राजूमामा भोळेंनी केली घोषणा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील श्रीकृष्ण कॉलनी परिसरात श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा. स्मिताताई वाघ यांना ‘संसदरत्न’ जाहीर झाल्याबद्दल नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक प्रा. सचिन पाटील उपस्थित होते. लोकसभा, राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राईम पॉईंट फाउंडेशन संस्थेकडून ‘संसदरत्न’ पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. तसेच लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा गौरव केला जातो. त्यात ‘संसदरत्न’ म्हणून जळगावच्या खा. स्मिताताई वाघ यांचा समावेश आहे. याबद्दल श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे त्यांचा ज्येष्ठ नागरिक अविनाश नेहेते यांच्या हस्ते…
जिल्हास्तरीय हरिपाठासह निरूपण स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : योग, याग, विधी येणे नोहे सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म… किती कर्मकांड करणार, किती उपाय, तोडगे करणार, मन शुद्ध ठेऊन फक्त एकनिष्ठ राहून पांडुरंग भजा. शहरी भागात हरिपाठ आवश्यक आहे.तो वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा, वर्तमान क्षणी राहणारा आता जीवन जगण्याचा सार सांगणारा ‘हरिपाठ’ असल्याचे ॲड.माईसाहेब महाराज पाटील यांनी सांगितले. राष्ट्रजागृती वारकरी परिषदेतर्फे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संत कबीर जयंती आणि आषाढी वारीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय हरिपाठासह निरूपण स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ॲड. माईसाहेब महाराज पाटील यांच्यासोबत प्रतिभा शिंदे, संस्थापक-अध्यक्ष राष्ट्रजागृती वारकरी परिषदेचे धर्मकिर्ती महाराज, ॲड. मधुकर सपकाळे, मनिषा…
एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील रजा कॉलनीत घरी एकटीच असणाऱ्या १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी, १० जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, हुमेरा रहीम पटेल (वय १५, रा. रजा कॉलनी, जळगाव) असे मयत मुलीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, तिने आत्महत्या का केली, त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याचे सांगण्यात आले. मजुरी काम करणारे तिचे वडील रहीम पटेल कामावर गेले होते. त्यांच्या पत्नी नातेवाईकांकडे गेल्या होत्या तर मुलगा घराबाहेर खेळत होता. घरात एकटीच असलेल्या हुमेराने गळफास घेतला. भाऊ घरात…