रॅलीने दिला सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी, ८ डिसेंबर रोजी समाज बांधवांतर्फे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीची सुरुवात तरुणांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत कुढापा चौक, नेरी नाका येथून झाली. ही रॅली पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चित्रा चौक, एस.टी. वर्कशॉप मार्ग असा मार्गक्रमण करत संताजी जगनाडे महाराज बगीचा येथे समारोप करण्यात आला. शहरातून निघालेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच रॅलीने सामाजिक एकतेचा प्रभावी संदेश दिला. रॅलीत शारदा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत सुरळकर, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला चौधरी, महानगराध्यक्ष मनीषा चौधरी, बेबाबाई सुरळकर, डॉ.…
Author: Sharad Bhalerao
अंधाराचा फायदा घेत चोरट्यांची मुजोरी वाढली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगरात पथदिव्यांच्या बेजबाबदार व्यवस्थापनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री पथदिवे बंद आणि दिवसा सुरू राहणे, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम गुन्हेगारीत वाढीवर होत असल्याचे समोर आले आहे. पहाटे ३ ते ४ दरम्यान झालेल्या दोन घरफोडींमध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सोनी नगरातील चारही गल्ल्यांमध्ये अनेक पथदिवे कायमस्वरूपी बंद आहेत तर काही पथदिवे रात्री ११ वाजता बंद होतात आणि सकाळी ६ वाजता सुरू होऊन दिवसभर सुरुच राहतात. अशा कारणामुळे रात्री परिसरात अंधार पसरतो. त्यामुळे चोरट्यांना…
३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा वर्चस्व प्रस्थापित साईमत/जळगाव/प्रतिनिधी : लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. त्यात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता दिलीप पवारने ‘सुवर्णपदक’ प्राप्त केले. स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती निकिताने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करुन महिलांच्या ५७ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. या यशामुळे हैदराबाद येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात तिचे स्थान निश्चित झाले आहे. तिने पहिल्या फेरीत ठाणे, दुसऱ्या फेरीत कोल्हापूर तर अंतिम फेरीत पुणेची खेळाडू श्रद्धा वाल्हेकर हिला नमवत सुवर्णपदकावर…
महोत्सवात होणार ‘पालखी’चा पाचवा प्रयोग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पद्मविभूषण रतन टाटा यांना समर्पित असलेला ‘नाट्य रतन’ महोत्सव मुंबईमध्ये होत आहे. ‘नाट्य रतन’ तर्फे कला आणि नाट्य महोत्सवाचे आयोजन मुंबईत केले आहे. यानिमित्त संपूर्ण देशातील बारा विविध भाषिक नाटकांची महोत्सवासाठी निवड केली आहे. जळगाव सारख्या छोट्या शहरातील नाटकाची निवड राष्ट्रीय महोत्सवात होणे ही जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. चार दिवस चालणाऱ्या नाट्य महोत्सवात परिवर्तन जळगाव नाट्यसंस्थेच्या शंभू पाटील लिखित आणि दिग्दर्शित ‘पालखी’ नाटकाची निवड केली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नाटके महोत्सवात सादर होणार आहेत. २५ ते २८ डिसेंबर या कालावधीत ‘नाट्य रतन’ महोत्सव यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे होणार आहे.…
बैठकीत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण ठरणारा निर्णय साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यातील कोणतेही गाव पाणीअभावी त्रस्त होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेआधी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा व जबाबदारीने काम करावे, असे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत जिल्ह्यातील ७५.३२४ दलघमी पाण्याचे आकस्मित आरक्षण निश्चित केले आहे. ३७१ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. त्यात मोठे कोअर प्रकल्प हतनूर व गिरणा प्रकल्पांतून मागणी…
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कुलमधील प्रांगणात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. उत्साह, श्रद्धा आणि कृतज्ञतेच्या भावनेत साजरा झालेला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.पी. निकम होते. कार्यक्रम समिती प्रमुख म्हणून डॉ. अशोक पारधे, डॉ. आर.डी. कोळी, अर्चना कोठावदे, सुनील तायडे, हर्षला जगताप, पर्यवेक्षक के.आर. पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध सादरीकरणे केली. त्यात अक्षर जिरंगे, वर्षा सूर्यवंशी, ओम रुले, कीर्तिका पाटील, नकुल हजारे, अक्षरा बोरडे, जयश्री निकम,…
सामाजिक बांधिलकीसह समानतेच्या तत्त्वावर मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रगती शाळेत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने अत्यंत श्रद्धापूर्वक त्यांना अभिवादन अर्पण केले. सुरुवातीला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी डॉ. आंबेडकरांच्या संविधान रचनेतील अमूल्य योगदानाची, सामाजिक समतेसाठी केलेल्या संघर्षाची आणि त्यांच्या दूरदृष्टीची उजळणी केली. विद्यार्थ्यांनी ‘माझा आदर्श-डॉ. आंबेडकर’ विषयावर मनोगत सादर करत त्यांच्या प्रेरणादायी विचारांना अभिव्यक्ती दिली. संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. बाबासाहेबांच्या शिक्षणावरील आग्रही भूमिका, सामाजिक बांधिलकी आणि समानतेच्या तत्त्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. महापुरुषांच्या कार्यातून…
पंधरा वर्षांपासून प्रलंबित विकासाअभावी नागरिक संतप्त साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक १८ आणि १९ (माजी १८ नं.) मधील नितीन साहित्य नगर, अमित कॉलनी, कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी परिसरातील दीर्घकालीन समस्या, केवळ निवडणुकीपुरती विकासाची चर्चा व पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या कामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे आणि उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा यांनी शनिवारी, ६ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मैदानात उतरत प्रभागातील नागरी सुविधांच्या समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रभागातील नितीन साहित्य नगर, अमित कॉलनी, कृष्णा नगर, पोलीस कॉलनीचा काही भाग, खूबचंद नगर, सुप्रीम कॉलनी स्टॉप ते सागर अपार्टमेंट या सर्व भागांमध्ये गेल्या १५…
काव्यसंमेलनाप्रसंगी प्रा.किसन वराडे यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : बोलीभाषा ह्या मानवी भावभावनांचे सहजोद्गार असतात. त्या उपजतच आत्मसात केल्या जातात. बोलीचे प्रकटीकरण सहजरित्या होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन वराडे-अंबरनाथ यांनी केले. खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई पुण्यतिथीनिमित्त लेवागणबोली दिनानिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेडतर्फे ‘ओवी गाई बहिणाबाई’ काव्यसंमेलन आयोजित केले होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) होते. त्यांनी भाषणातून अशा प्रकारची संमेलने सातत्याने होत राहिली तर बोली भाषांच्या संवर्धनाला मोलाची मदत होईल, असे बहिणाबाईंची बोलीभाषा टिकवायची तिचे संवर्धन करायची जबाबदारी यापुढील साहित्यिकांनी समर्थपणे सांभाळावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अखिल भारतीय लेवा…
‘स्वच्छतेचा संदेश’ जिवंत अभिनयातून नागरिकांपर्यंत पोहोचवला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्यावतीने समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने बसस्टँड, रेल्वे स्टेशन, काव्यरत्नावली चौक, एम.जे.कॉलेज परिसरात प्रभावी पथनाट्याचे आयोजन केले होते. शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण आणि जिवंत अभिनयातून ‘स्वच्छतेचा संदेश’ नागरिकांपर्यंत पोहोचवला. पथनाट्यातून स्वच्छ परिसर राखण्याचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा कमी वापर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थिनींच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे दिलेला संदेश थेट हृदयाला भिडणारा ठरला आणि उपस्थित नागरिकांनी त्याचे कौतुकाने स्वागत केले. उपक्रमाचे संयोजन आणि मार्गदर्शन मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, प्रतिभा लोहार, रोहिणी पाटील, दिगंबर पाटील, रफिक नजीर तडवी, वेदप्रकाश गडदे, नूतन…