Author: Sharad Bhalerao

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे ‘आर्थिक साक्षरतेवर’ व्याख्यान, कॅमेरा पूजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जिल्ह्यातील असलेले वैविध्य पर्यटन आणि विकासाकडे केवळ जिल्ह्यातीलच नागरिकांचे लक्ष नाही तर राज्यातील इतरही जिल्ह्याचे लक्ष आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘फेसबुक पेजवर’ इतर राज्यातील देशातील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे जळगावच्या विकासाचा चेहरा जगापुढे मांडणाऱ्या सर्व छायाचित्रकारांवर जिल्ह्याचे सौंदर्य जास्तीत जास्त प्रकर्षाने मांडण्याचे एक चांगले आवाहन निर्माण झाले आहे. त्याचा योग्य लाभ घेऊन आपण काढलेले सुंदर छायाचित्र मला वैयक्तिक पाठवा, मी ते फेसबुक पेजवर प्रकाशित करेल. जिल्ह्याच्या प्रगतीला आपण हातभार लावू या, असे प्रेरणादायी आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जळगाव प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.…

Read More

जुने जळगाव परिसरात पसरली शोककळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील जुने जळगाव परिसरातील रामपेठ भागात एका तरुणाने राहत्या घरी वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन ‘आयुष्य’ संपविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे जुने जळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. मयत तरुणाचे जयेश मुरलीधर खडके (वय २७) असे नाव आहे. शहरातील जुने जळगाव परिसरातील रामपेठ भागात जयेश हा आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता. तो एमसीएचे शिक्षण घेऊन आता रोजगाराच्या शोधात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. काही दिवसांपासून तो जॉबच्या शोधात होता. मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास जयेशच्या घरातील सदस्य…

Read More

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पथकाला मिळाले यश साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  ग्रामीण भागातील एका तरुणाला राहत्या घरी रात्री झोपलेला असतांना ‘विषारी’ सापाने जीवघेणा दंश केला. गंभीर झालेल्या तरुणावर योग्य ते औषधोपचार करून वैद्यकीय पथकाने ‘मृत्यूच्या दाढेतून’ परत आणले आहे. ही कौतुकास्पद यशस्वी कामगिरी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पथकाने केली आहे. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे. सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील शिवनी येथील २५ वर्षीय तरुण कर्णसिंग धैर्यसिंग पवारला गेल्या १४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजता घरात झोपलेला असताना उजव्या कानाला ‘मण्यार’ अशा अतिविषारी सापाने दंश केला. त्याला तात्काळ भडगावातील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगावच्या…

Read More

माजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनी भागातील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक व डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी, २० ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती ‘सद्‌भावना दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी महापौर जयश्रीताई महाजन यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले. सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मिळून सद्‌भावना दिनानिमित्त सद्‌भावना शपथ घेतली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्यासह सरोज पाटील, सरला फिरके, आशा महाजन, प्रफुल्ल नेहते, विकास नेहते, विजय चौधरी, केतन बऱ्हाटे, श्री.खंडारे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुशिल सुरवाडे यांनी केले.

Read More

मान्यतेमुळे पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून प्राध्यापकांना मिळणार काम करण्याची संधी  साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नर्सिंगमध्ये पीएच.डी. संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मिळाली आहे.त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि संशोधनाचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. ही मान्यता विद्यापीठाच्या २५ जून आणि २२ जुलै २०२५ च्या ठरावानुसार देण्यात आली आहे. त्यामुळे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग, मेंटल हेल्थ, सायकेट्रिक नर्सिंग, ऑब्स्टेट्रिक व गायनॅकोलॉजिकल नर्सिंग, आणि मेडिकल सर्जिकल नर्सिंग अशा विषयांमध्ये संशोधन करता येणार आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांना मान्यतेमुळे पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना…

Read More

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधीक्षकांना मनसेतर्फे दिले निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील एमआयडीसी परिसरातील अनेक खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत कामगारांच्या पगारातून दरमहा नियमितपणे भविष्य निर्वाह निधी म्हणून रक्कम कपात केली जाते. मात्र, ही कपात केलेली रक्कम संबंधित कंपन्यांकडून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली जात नसल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कामगारांच्या कपातीच्या भविष्य निर्वाह निधी रकमेबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मनसेने लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अशा आशयाचे निवेदन जळगाव भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधीक्षकांना बुधवारी, २० ऑगस्ट रोजी देण्यात आले. निवेदन देतेवेळी महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, रज्जाक सय्यद, अविनाश पाटील, दीपक…

Read More

तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक पटकावले साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील अनुभूती निवासी स्कूलमध्ये जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धा-२०२५ सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले. अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडानुभूतीमधील बॅडमिंटन हॉल येथे स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी जळगाव तालुका क्रीडा प्रमुख प्रशांत कोल्हे, अन्य शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेत जळगाव तालुक्यातील २८ संघांनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांच्या मान्यतेने जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, जैन स्पोर्टस अकॅडमीद्वारे आयोजित केले होती. स्पर्धेत…

Read More

वाघ नगरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील एमआयडीसी परिसरातील स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजमधून झालेल्या कॉपरच्या पट्ट्यांच्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई वाघ नगर येथे करण्यात आली. स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजमधून शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अंदाजे ४० हजार रुपये किमतीच्या कॉपरच्या पट्ट्या चोरीला गेल्या होत्या. कंपनीचे मॅनेजर बाळू गोवर्धन पाटील यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, ही चोरी कंपनीतच काम करणाऱ्या व्यक्तींनी केली आहे. अशा…

Read More

नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिला दिलासा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   तालुक्यातील २४ गावातील शेतकऱ्यांना सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि नाले, ओढ्याच्या पुराचे पाणी शेत शिवारात प्रवाहित झाल्याने शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान जळगाव, धरणगाव तालुक्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रत्यक्ष भेट देत नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. तालुक्यातील वडली, म्हसावद येथे काही दुकानांसह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासही हिरावून नेला आहे. प्रत्यक्ष शेतात येऊन श्री.देवकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकून पाहणी केली. त्यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्ता भारणे यांच्याशी तात्काळ दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थिती मांडली. कृषीमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नुकसान भरपाईसंदर्भात न्याय…

Read More

माऊली नगर परिसरात चिमुकल्याचा तोडला ‘लचका’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील माऊली नगर परिसरात मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता एका पाच वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करुन ‘लचका’ तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. आरएमएस कॉलेजजवळील माऊली नगरातील रहिवासी रवींद्र सुनील पाटील हे आपल्या पत्नी आणि पाच वर्षीय मुलगा समर्थ रवींद्र पाटील यांच्यासोबत राहतात. समर्थ हा १९ ऑगस्ट रोजी शाळेतून घरी आल्यानंतर…

Read More