District Collector : छायाचित्रकारांनी काढलेले सुंदर छायाचित्र ‘फेसबुक पेजवर’ प्रकाशित करणार : जिल्हाधिकारी

0
26

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे ‘आर्थिक साक्षरतेवर’ व्याख्यान, कॅमेरा पूजन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जिल्ह्यातील असलेले वैविध्य पर्यटन आणि विकासाकडे केवळ जिल्ह्यातीलच नागरिकांचे लक्ष नाही तर राज्यातील इतरही जिल्ह्याचे लक्ष आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘फेसबुक पेजवर’ इतर राज्यातील देशातील प्रेक्षक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे जळगावच्या विकासाचा चेहरा जगापुढे मांडणाऱ्या सर्व छायाचित्रकारांवर जिल्ह्याचे सौंदर्य जास्तीत जास्त प्रकर्षाने मांडण्याचे एक चांगले आवाहन निर्माण झाले आहे. त्याचा योग्य लाभ घेऊन आपण काढलेले सुंदर छायाचित्र मला वैयक्तिक पाठवा, मी ते फेसबुक पेजवर प्रकाशित करेल. जिल्ह्याच्या प्रगतीला आपण हातभार लावू या, असे प्रेरणादायी आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जळगाव प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, बढे कॅपिटलचे संचालक ज्ञानेश्वर बढे, प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधीपाल वानखेडे यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. भैरवी पलांडे-वाघ, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डाॅ. केतकी पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थिती देऊन छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या. ‘आर्थिक साक्षरता’ विषयावर ज्ञानेश्वर बढे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाला वृत्तपत्र छायाचित्रकार सचिन पाटील, गोकुळ सोनार, नितीन सोनवणे, आबा मकासरे, ज्येष्ठ छायाचित्रकार शब्बीर सय्यद, मनपाचे फोटोग्राफर वैभव धर्माधिकारी, कवयित्री बहिणबाई चौधरी विद्यापीठाचे फोटोग्राफर शैलेश पाटील, पोलीस फोटोग्राफर जयंत चौधरी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे फोटोग्राफर अभिषेक मकासरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे रिटायर फोटोग्राफर सुरेश सानप, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे फोटोग्राफर राजु माळी, व्यावसायिक फोटोग्राफर संघटनेचे प्रकाश मुळे, नितीन थोरात, रूपेश महाजन, उदय बडगुजर, संदीप याज्ञिक, राजु जुमनाके, उमेश चौधरी, प्रवीण गायकवाड, निखिल सोनार, बंटी बारी, चित्रनिश पाटील, विनोद बारी, अतुल वडनेरे, रोषण पवार, जितेंद्र टेकावडे, प्रादेशिक न्युज चॅनलचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे, किशोर पाटील, वाल्मिक जोशी, नितीन नांदुरकर, सचिन गोसावी, युट्यूब चॅनलचे प्रतिनिधी अयाज मोहसिन, सतीश सैदाणे, विक्रम कापडणे, नाजनीन शेख, चेतन वाणी, सुनील भोळे, जकी अहमद, निखिल वाणी, काशिनाथ चव्हाण, योगेश चौधरी, संदीप महाले, विकास पाथरे, दीपक सपकाळे, संदीप होले, कल्पेश वाणी आदी उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे हेमंत पाटील, सचिन पाटील, जुगल पाटील, पांडुरंग महाले, अरूण इंगळे, भूषण हंसकर, भूषण पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे सचिव अभिजीत पाटील तर आभार सुमित देशमुख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here