Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नव्या पिढीसाठी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा चित्रप्रदर्शनातून मांडण्यात आला आहे. विद्यार्थी, पालकांनी या चित्रप्रदर्शनाला भेट देऊन देशाचा इतिहास समजून घ्यावा. जो इतिहास समजून घेईल, तो इतिहास निर्माण करू शकतो. या विचाराने जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, संघटना प्रतिष्ठान यांनी चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन खा.उन्मेश पाटील यांनी केले. चाळीसगाव बस स्थानकात सोमवारी, १४ ऑगस्ट रोजी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय- जळगाव यांच्या विद्यमाने मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन खा.उन्मेश पाटील यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय संचार ब्यूरो प्रबंधक संतोष देशमुख, पंचायत…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बापु चौधरी यांनी भारतीय सैन्य दलात वीस वर्षे देशाची सेवा बजावली. त्यात त्यांनी काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, पुणे अश्ाा ठिकाणी देशाची सेवा केली. ते दोघे भाऊ सैन्यात आहे. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर रेल्वे स्थानकापासून माजी सैनिक त्रिदल सेना उत्तर महाराष्ट्र आबासाहेब गरुड यांच्या टीमने मिरवणूक गाजत वाजत काढली. मिरवणुकीत देशसेवेचे गाणे वाजविण्यात आले. यावेळी विकास देवरे, गोविंद वाघ, नितीन परदेशी, वाल्मिक बागुल, समाधान राठोड, गुलाब पाटील, विजय पाटील, मनोज महाडिक यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडीजवळ समाधान मोरे यांची शेती आहे. शेतातील विहिरीत गेली पाच दिवसापासून विषारी जातीचा नाग पडलेला होता. शेतकऱ्याने त्याची माहिती ब्राम्हणशेवगे येथील सर्पमित्र गौरव नेरकर यांना दिली. अथक परिश्रमानंतर नाग विहिरीतून बाहेर काढण्यात येऊन नैसर्गिक आदिवासात सोडून ‘जीवदान’ दिले. यावेळी परिसरातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. याबद्दल गौरव नेरकरचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे… क्षणात येथे सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे… अशा सुंदर शब्दात श्रावणमासाचे वर्णन करणारे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची जयंती समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे साजरी करण्यात आली. याप्रसंगी साहित्यिकांनी त्यांच्या जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांच्या कविताही सादर केल्या. यांना वाहिली आदरांजली सुरुवातीला रानकवी ना.धों.महानोर, ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके, सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बालकवी यांच्या पणती विशाखा कुलकर्णी, प्रा.प्रकाश महाजन, निवृत्तीनाथ कोळी, पुष्पलता कोळी, युवराज सोनवणे, अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, गोविंद पाटील, किशोर पाटील, भीमराव सोनवणे, किशोर नेवे,…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोरगाव येथील एका व्यापाऱ्याची दूचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील सचिन प्रभाकर पाटील (वय ४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ११ ऑगस्ट रोजी त्यांनी त्यांची दूचाकी (क्र.एमएच १९ डीटी ४२०४) ही त्यांच्या घरासमोर पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्याने रात्री १० वाजेच्या सुमारास ४५ हजार रूपये किंमतीची दूचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी, १२ ऑगस्ट…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर गेल्या १७-१८ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरपंच अक्षय जैस्वाल यांनी वार्ड क्रमांक ४ मधील मागासवर्गीय वस्तीचा निधी वस्तीत वापर न करता इतरत्र खर्च दाखवून जाणीवपूर्वक शासनाच्या १५ टक्के मागासवर्गीय ग्राम निधी व दलित वस्तीच्या निधींपासून मागासवर्गीयांना वंचित ठेवले आहे, अशा आशयाच्या तक्रारीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य दीपक खरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील खरे, विजय बाविस्कर यांनी जळगाव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंच जैस्वाल याच्यावर कारवाई करावी आणि विकासकामांबाबत न्याय न मिळाल्यास मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे. वार्डातील पुरुष-महिला यांनी मागासवर्गीय वस्तीत १५…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे रविवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जळगावच्या राजा श्री गणेशाचे पाटपूजन व मंडप सोहळा महानगरपालिकेच्या इमारतीखाली उत्साहात पार पडला. याप्रसंगी भाविकांनी ढोल ताशांच्या तालावर जल्लोष केला. यावेळी भाविकांच्या उत्साहात लक्षवेधी अशा ढोल पथकाचे उत्तम सादरीकरण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही नेहरू चौक मित्र मंडळातर्फे रविवारी जळगावचा राजा श्री गणपती यांचे पाटपूजन व मंडप सोहळा आयोजित केला होता. यंदाचे ३७ वे वर्ष आहे. धीरज व रुचिता अग्रवाल या दाम्पत्याच्या हस्ते पाटपूजन पवित्र मंत्रघोषात पार पडले. पाटपूजननंतर श्री गणपतीची महाआरती मान्यवरांच्या हस्ते झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जनता बँकेचे संचालक ललित…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी ब्राह्मण तलावा शेजारील शेतात औदुंबराच्या झाडाखाली निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या काव्य प्रतिभेला जन्म देत बालकवी कविता लिहित होते. त्याच जागेवर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेना तालुका प्रमुख लेखक, कवी जयदीप पाटील यांच्या हस्ते बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून बालकवींची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कविवर्य बालकवी तसेच त्यांच्या साहित्य क्षेत्रात केलेली माहिती विषद केली. भविष्यात बालकवींचे स्मारक लवकरात लवकर न उभारले गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शासन तसेच लोकप्रतिनिधींकडून बालकवींचे स्मारक पूर्ण होऊ शकत नाही. याबाबत गुलाबराव वाघ यांनी खंत व्यक्त केली. मतदारसंघात आजपर्यंत जे…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत ‘मेरी माती मेरा देश’ संपूर्ण देशात राबविले जात आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी व लोकांमध्ये आपल्या देशाबद्दल देशप्रेमाची भावना जागृत व्हावी, यासाठी अमळनेर नगर परिषदेतर्फे धुळे-चोपडा रस्त्यावरील दुभाजकावर असलेल्या स्ट्रीट लाईट पोलवर तिरंगा विद्युत रोषणाई केलेली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस अमळनेर प्रकाशमय झाला आहे. अमळनेरच्या सौंदर्यात वाढ करून व तिरंगा रंगाच्या रोषणाईने देशाप्रती एक देशप्रेमाची भावना दाखविण्याची संकल्पना दाखविण्याचे नाविन्यपूर्ण काम अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता प्रशांत ठाकूर यांनी उत्कृष्टपणे केले आहे. याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तांबोळे खु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना रयत सेनेच्यावतीने रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते नुकतेच वह्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून रयत सेनेच्यावतीने प्रत्येकवर्षी गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय साहित्य वाटपामुळे गरजु विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे समाधान वाटते. चाळीसगाव येथील पवारवाडी विठ्ठल रुख्मिणी मंदिरात स्वामी विवेकानंद शाळेच्या १०० विद्यार्थ्यांना शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मेहुणबारे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. रयत सेनेने ग्रामीण भागात येऊन जि.प.शाळेच्या गरजु विद्यार्थ्यांना वही वाटप केल्याबद्दल…

Read More