Author: Sharad Bhalerao

साईमत, एरंडोल : प्रतिनिधी शहरातील एक महिला पहाटे मॉर्निंग वॉकला जात असतांना चोरट्यांनी गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची अर्धी पोत लांबविणाऱ्या तिघांपैकी दोन संशयितांना पकडण्यात एरंडोल पोलिसांना यश आले आहे. सविस्तर असे की, एरंडोल येथे विमलबाई चौधरी यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील संशयित आरोपी चोरटे हे चाळीसगाव येथील मुसा कादरी बाबा दर्गा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरुन एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश अहिरे, पो.उ.नि. शरद बागल, पो.कॉ. अनिल पाटील, पो.ना. मिलिंद कुमावत, अकिल मुजावर आदींनी…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरातील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, शासकीय रुग्णालय याठिकाणी वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. रक्षाबंधन उत्सवात प्रतिष्ठानचे राहुल चव्हाण, मयूर चौधरी, राहुल पोहेकर, अंकुश जोशी, विशाल सोनवणे, रवि पाटील, केतन जोशी, किरण जाधव, पवन सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कर्मचारी वृंद हा एक समाजाचा विश्वासाचा भाग आहे. विविध ठिकाणी काही समाज कंटक जाणीवपूर्वक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. आपली सरकारी नोकरी म्हणून आपले बंधू त्रास सहन करत असतात. यानिमित्त वंदन मातृभूमी प्रतिष्ठान आपल्या सोबत आहे. अत्याचार अन्याय झाला तर कधी पण आवाज द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारत सरकारच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्यावतीने ‘लेटेस चेंज ‘स्वच्छता मॉनिटर उपक्रमाचा प्रारंभ जामनेर केंद्राच्या केंद्रप्रमुख संगीता पालवे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर पाटील, एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास काळे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्ञानगंगा विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या ५० विद्यार्थ्यांची ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून निवड करण्यात आली. समन्वयक म्हणून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विलास पाटील यांची निवड झाली. यावेळी प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात चांगले काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिपाठात गौरव करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसगाव टाकळी परिसरातील शेतकरी नानाजी हनुमंत सोनवणे शेतीला पुरेशी वीज मिळत नसल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. अशीच अवस्था शिरजगाव सबस्टेशनवर अवलंबून असलेले टाकळी ताळोंदा, देशमुखवाडी, आलूवाडी आणि शिरसगाव अशा अनेक गावात शेतकरी आणि ग्रामस्थांची झाली आहे. सतत ट्रिप होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. यंदा पावसाने एक महिन्यापेक्षा अधिकची उघडीप दिली. कोरडवाहू शेती पीक मातीमोल झाली आहे. ज्या शेतकऱ्याकडे विहिरी आहेत. त्या विहिरींनी तळ गाठला आहे. ठिबक, तुषारसिंचन करून पीक जगविली जात आहेत. पण त्यासाठी सलग वीज मिळत नाही. सलग पाच तास वीज देणे बंधनकारक आहे. वीज येते ट्रिप होते, बंद पडते. पुन्हा येते, पुन्हा बंद…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी भाऊ आणि बहिणींमधील रक्षाबंधन हा पवित्र बंध साजरा करणारा सण आहे. जो श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन बुधवारी, ३० ऑगस्टला आहे. बहुतेक वेळा असे घडते की, रक्षाबंधनावर भद्रा काळाचा परिणाम होतो आणि भाऊ-बहिणीच्या सणात अडचण येते. यावेळीही रक्षाबंधनावर भद्राची छाया असल्यासारखे आहे. तिथी आणि भद्राच्या फेरफारामुळे यावेळीही रक्षाबंधन २ दिवस साजरे केले जाणार आहे. म्हणजेच ३० आणि ३१ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. भद्राकाळामुळे रात्री बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतील. बाहेरगावी असणाऱ्या भावाला राखी पाठविण्यासाठी बहिणींची राखी खरेदीची लगबग दिसून येत आहे. राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मानवी साखळीमधून ‘इस्त्रो’ शब्द तसेच मानवी साखळी राखी तयार करून विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन उत्साहात व जल्लोषात साजरी करुन बहिण भावांचा प्रेमाचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधली, खाऊ म्हणून बिस्कीटचे वाटप करण्यात आले. नर्सरीपासून प्राथमिक इयत्ता एक ते चार विभागात उपक्रम साजरा करण्यात आला. मानवी साखळीमधून राखी तयार करण्याचे तसेच ‘इस्त्रो’ शब्द संकल्पना स्वर्णा अडकमोल तसेच सुदर्शन पाटील यांची होते. यासाठी सविता ठाकरे, दीपाली जगताप, श्रीमती शिरसाट, सीमा जोशी तसेच प्रभारी मुख्याध्यापिका नीलिमा भारंबे यांचे सहकार्य लाभले. प्रोत्साहन संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील, संचालिका प्रतीक्षा पाटील, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीपाली…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी गेल्या महिन्याभरापासून अमळनेर तालुक्यात पाऊस पडलेला नाही. म्हणून अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करून शासनाने जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, अशी मागणी अमळनेर तालुका शिवसेना (उबाठा) तर्फे केली आहे. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना नुकतेच देण्यात आले. तालुक्यात महिनाभर पाऊस खंडित झाल्याने पिकांचे हाल झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे गेले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नुकसानापोटी अनुदान देण्यात यावे. तसेच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल म्हणून शासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील, शहरप्रमुख सुरज परदेशी, विजय…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेत मंगळवारी, २९ रोजी राष्ट्रीय खेळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील दीडशे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळात सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी होत्या. याप्रसंगी क्रीडा शिक्षिका आर.एस.सोनवणे, शिक्षक जे.व्ही.बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या संदर्भात माहिती दिली. मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यात क्रीडा सप्ताह आयोजित केला आहे, असे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळ महत्वाचे आहेत, असे सांगितले. शासनाच्या पत्रकानुसार संगीत खुर्ची, लिंबू चमचा, कबड्डी, गोणपाट, रस्सीखेच स्पर्धा, धावणे शर्यत अश्ाा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विजेत्या संघास मेजर ध्यानचंद ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर, पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील, एस.एस.माळी,…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल येथे सुवर्ण महोत्सवानिमित्त राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. क्रीडा शिक्षक अरविंद सोनटक्के, स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी, एस.के. महाजन यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या संदर्भात माहिती दिली. यावेळी शाळेतील ७० विद्यार्थी वेगवेगळ्या खेळात सहभागी झाले होते. मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यात क्रीडा सप्ताह आयोजित केला आहे. हे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले. विविध खेळात विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त झाले. संगीत खुर्चीत वैष्णवी श्याम पाटील, अमर वसावे, रोहित पोरबा तडवी, लिंबू चमचा स्पर्धेत मयुरी महाजन, निशा जाधव, तन्मय बैसाणे, संकेश वसावे, चैतन्य…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी बाबासाहेब पुरंदरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकत्रित शिल्प तयार करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणून बुजून काही समाजकंटक प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. आमचे आराध्य दैवतही आहेत. तसेच सर्व महापुरुषांचे व महाराष्ट्रातील जनतेचे ते आदर्श आहेत. महापुरुषांचा योग्य तो सन्मान नेहमीच आपण करीत असतो. त्यांची बरोबरी कोणाही व्यक्ती बरोबर आपण करीत नाहीत. तरीही समाजात गैरसमज निर्माण व्हावा, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण व्हावी आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही ठराविक संघटना करीत असतात. नेहमीच समाजात अस्थिर वातावरण तयार करीत…

Read More