छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

0
6

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी बाबासाहेब पुरंदरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकत्रित शिल्प तयार करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणून बुजून काही समाजकंटक प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. आमचे आराध्य दैवतही आहेत. तसेच सर्व महापुरुषांचे व महाराष्ट्रातील जनतेचे ते आदर्श आहेत. महापुरुषांचा योग्य तो सन्मान नेहमीच आपण करीत असतो. त्यांची बरोबरी कोणाही व्यक्ती बरोबर आपण करीत नाहीत. तरीही समाजात गैरसमज निर्माण व्हावा, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण व्हावी आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न काही ठराविक संघटना करीत असतात. नेहमीच समाजात अस्थिर वातावरण तयार करीत असतात. बाबासाहेब पुरंदरेने सांगितलेला इतिहास आम्हाला कधीही मान्य नाही आणि त्यांच्या विचारांशी आमचा नेहमी वैचारिक विरोध राहिला आहे. हे शिल्प तयार करून ज्यांनी हे षडयंत्र तयार केले आहे. त्यांच्यावर आणि ज्यांनी हे बालगंधर्व रंगमंदिरात लावले त्या व्यक्तीवर तसेच ज्यांनी परवानगी दिली त्या व्यक्तीवर तेढ निर्माण करण्याचे खटले दाखल करत तात्काळ कार्यवाही करावी. तसेच ते शिल्प तिथून तात्काळ हटवित शिल्पावर कायमस्वरुपी बंदी आणावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन संघर्ष मोर्चाच्यावतीने उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना देण्यात आले.

निवेदन देतेवेळी संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, जयंतलाल वानखेडे, बापूराव ठाकरे, दीपक काटे, सुरेश कांबळे, हितेंद्र बडगुजर, नुरखान, कमलेश वानखेडे, विक्की जाधव यांच्यासह सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here