साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मानवी साखळीमधून ‘इस्त्रो’ शब्द तसेच मानवी साखळी राखी तयार करून विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन उत्साहात व जल्लोषात साजरी करुन बहिण भावांचा प्रेमाचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधली, खाऊ म्हणून बिस्कीटचे वाटप करण्यात आले. नर्सरीपासून प्राथमिक इयत्ता एक ते चार विभागात उपक्रम साजरा करण्यात आला.
मानवी साखळीमधून राखी तयार करण्याचे तसेच ‘इस्त्रो’ शब्द संकल्पना स्वर्णा अडकमोल तसेच सुदर्शन पाटील यांची होते. यासाठी सविता ठाकरे, दीपाली जगताप, श्रीमती शिरसाट, सीमा जोशी तसेच प्रभारी मुख्याध्यापिका नीलिमा भारंबे यांचे सहकार्य लाभले. प्रोत्साहन संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील, संचालिका प्रतीक्षा पाटील, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीपाली देवरे यांचे लाभले.