साईमत, अमळनेर : प्रतिनिधी कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीनच्या नावाने वीज बंद करण्याच्या घटना घडत असल्याने तापी परिसरातील मठगव्हाण, नालखेडा, रुंधाटी, मुंगसे, गंगापुरी, पातोंडा येथील संतप्त शेतकऱ्यांनी पातोंडा येथील महावितरणच्या उपकेंद्रात धडक देऊन घेराव घालून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने पावसाचा अजूनही पत्ता नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. मशागतीसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून टाकले. जून महिन्यात लागवड केलेली बागायती कापसाची पिके आता कमरेइतके वाढलेली आहेत. काही दिवसांनी कापूस वेचणीला लागतील, अशी पिकांची स्थिती आहे. पण पावसाचे पाणी महिनाभरापासून न पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात जिराईत पिकांची स्थिती कोलमडली…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव/पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या तरुणाच्या घरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तीन तलवारी हस्तगत केल्या आहे. त्याच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तरूणाला अटक केली आहे. हर्षल विनोद राजपूत (वय २०, रा.मोहाडी, ता.पाचोरा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर असे की, पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात हर्षल विनोद राजपूत हा त्याच्या घरात प्लास्टिक पिशवीत तीन तलवारी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १० हजाराच्या…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी धरणगाव ते एरंडोलदरम्यान बांभोरी-टोळी (ता. धरणगाव) येथील स्थानकात बस थांबत नसल्याने गुरुवारी, ३१ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडून आंदोलन केले. शिवसेना ठाकरे गटाच्या सहसंपर्कप्रमुखांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेत थेट अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी समस्या जाणून सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे धरणगाव-एरंडोल रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बांभोरी-टोळी येथील १५० ते २०० विद्यार्थी धरणगाव येथील शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ते गावातून रोज बसने प्रवास करीत धरणगावला येतात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बांभोरी-टोळी येथील…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाचोरा नगरपरिषदेने दोन दिवसांपासून जंतूनाशके, औषध फवारणी मोहिमेला गती दिली आहे. गल्लीबोळ आणि अडगळीतील जागांवर डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत आहे. यासह नागरिकांनी साथीच्या आजाराबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे. पाचोरा नगर पालिकेच्या मुख्याधिकारी बाविस्कर यांनी नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत संपूर्ण शहरभर डास प्रतिबंधक फवारणीची मोहीम आखणी केलेली आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना पाणी साठवणीचे साहित्य आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे, त्यावर नियमित झाकण ठेवावे, गळके नळ वेळीच दुरुस्त करणे, घराभोवती कचरा साठवू नये, पावसाचे व सांडपाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाचे माजी प्रा. यशवंत दिगंबर नाडकर्णी यांचे गेल्या २५ ऑगस्ट रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. याबद्दल पदार्थ विज्ञान विभागाच्यावतीने श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दिवंगत प्रा. यशवंत नाडकर्णी यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. याप्रसंगी पदार्थ विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख तथा माजी प्राचार्य डॉ. अ. गो. सराफ, प्रा. डॉ. उदय देशपांडे, (रसायनशास्त्र विभाग), प्रा. एस. डी. ओसवाल, प्रा. एम. एस. बडगुजर (कनिष्ठ महाविद्यालय रसायनशास्त्र विभाग), प्रा. एस. जी. अग्निहोत्री (पदार्थ विज्ञान कनिष्ठ विभाग), प्राचार्य डॉ. ए. बी.जैन, माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात सरासरीपेक्षा किती तरी पट कमी पाऊस झाला आहे. पाण्याअभावी पिके करपली आहेत. पाऊस उशिराने आला तरी पिकांचे नुकसान भरुन निघणार नाही. मागील वर्षाचा कापसाचा निच्चांक दर व घरात पडून असलेला कापूस इतर धान्य, कडधान्य यांना मिळणारा तुटपुंजा भाव, भाजीपाल्याच्या भावात अस्थिरता एकूणच सर्व प्रकार शेतकऱ्यांच्या जीवनात रौद्ररुप घेऊन आलेला आहे. पिक विम्याच्या निकषाची ९ पैकी ३ मंडळे घोषित झाली आहेत. यासंदर्भात तातडीने लक्ष घालून दुष्काळ जाहीर करत त्या संदर्भाची अनुदाने पिकविम्यासाठीचे पंचनामे, गुरांच्या छावण्या, पिण्याच्या पाण्याचे नियोजन यासंदर्भात पावले उचलावीत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष तीव्र स्वरुपाचे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील स्वयंदीप दिव्यांग महिला संस्था ह्या सामाजिक संस्थेतर्फे रक्षाबंधन निमित्त दिव्यांग महिला भगिनींनी वर्धमान धाडीवाल यांच्यासह पत्रकार मुराद पटेल, गणेश गवळी, रामलाल मिस्तरी, अमन पटेल, समीर शेख यांना संस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षी निकम, भारती चौधरी, शारदा निकम, निर्मला अगोने, पोळ, करुणा शिंदे, छाया वणकोट, सोनाली मोरे, स्मिता खरे, शालू पाटील, कल्पना चौधरी, रजा पिंजारी, जयश्री कासार यांनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या जयश्री वर्धमान धाडीवाल, अंजुम मुराद पटेल ह्या उपस्थित होत्या. आभार संस्थाध्यक्षा मिनाक्षी निकम यांनी मानले.
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डॉक्टर सेलवर प्रदेश सरचिटणीसपदी डॉ.अनिरुद्ध साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या शिफारशीवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.मनोज राका यांनी डॉ.साळवे यांची डॉक्टर सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली. नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या हस्ते मुंबई येथील टिळक भवनात देण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या संघटनेसाठी योगदान देवून पक्षाची विचारसरणी घराघरात पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नियुक्तीबद्दल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष ॲड.अमजद पठाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा अंतर्गत दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील, चोपडा येथील रसायनशास्त्र विभागातील एम. एस्सी. द्वितीय वर्षाच्यावतीने ‘सामूहिक रक्षाबंधन’ समारंभ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. एम.जी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ले. डॉ. बी. एम. सपकाळ, प्रा. डॉ. पी. के. लभाणे, प्रा. डॉ. एस. आर. पाटील, प्रा. डॉ. के. एस. भावसार, प्रा. मयूर पाटील उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांनी मुलींना श्रीमद्भगवदगीता व पेन भेट म्हणून दिले. मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन संदीप भदाणे तर विद्यार्थी प्रतिनिधी सोहन…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील जांभोळ येथील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांनी निरोपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘ सन्मान गुरुजनांचा व निरोप समारंभ’ असा दुहेरी कार्यक्रम समितीने नियोजित केलेला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जैन इरिगेशन समूहाचे संचालक राजपूत होते. मागील काही १९९१ वर्षापासून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांना कार्यक्रमाला आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात शेषराव देशमुख गुरुजी, दिलीप कुंभार, सुनील पाटील, अनिल महाजन, श्री.खैरनार, श्रीमती शेवाळे तसेच ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांनाही निरोप देण्यात आला. त्यात राजेंद्र भोई, नाना धनगर, श्री.सुरळकर, श्री.इंगळे, श्री.पाटील यांचा समावेश होता. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ औक्षण करून फुलांचा वर्षाव करून शाळा व्यवस्थापन समिती व…