काँग्रेसच्या डॉक्टर सेल प्रदेश सरचिटणीसपदी डॉ. अनिरुद्ध साळवे

0
1

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डॉक्टर सेलवर प्रदेश सरचिटणीसपदी डॉ.अनिरुद्ध साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या शिफारशीवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.मनोज राका यांनी डॉ.साळवे यांची डॉक्टर सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली. नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या हस्ते मुंबई येथील टिळक भवनात देण्यात आले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या संघटनेसाठी योगदान देवून पक्षाची विचारसरणी घराघरात पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नियुक्तीबद्दल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष ॲड.अमजद पठाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here