साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील प्रत्येक केंद्रनिहाय एक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज शिक्षक बंधू-भगिनींना चाळीसगाव स्तरीय माजी सभापती पुरस्कृत ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरित केला जातो. माजी सभापती स्मितल बोरसे आणि पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे यांच्या संकल्पनेतून चारवर्षांपासून अतिशय अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला जातो. यंदाच्या पाचव्यावर्षासाठी निवड केलेल्या शिक्षक बंधू-भगिनींच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी, एक मोमेंटो गिफ्ट, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात परिसरातील सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. लख्ख प्रकाशात दिवाळी सणासारखेच वातावरण तयार झाले होते. झेंडूच्या फुलांचा वर्षाव पाहून सर्व कुटुंबातील सदस्य भारावून गेले होते. तसेच अनेकांच्या…
Author: Sharad Bhalerao
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला. यादिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून तासिका घेऊन दिवसभराचे कामकाज पाहिले. अध्यक्षस्थानी संस्थेचेे ज्येष्ठ संचालक भीमराव शेळक होते. विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांच्या भूमिका बजावल्यामुळे विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. यावेळी माजी मुख्याध्यापक ए.ए. पटेल, सामाजिक कार्यकर्ते अण्णा बेलदार, माजी उपसरपंच आबा चौधरी, गोपाळ पांढरे, गणेश कोळी, ‘माणुसकी समूहा’चे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार गजानन क्षिरसागर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण आणि डॉ.जे.जी.पंडित यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संस्थेच्यावतीने शिक्षकांचा रुमाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ.जे.जी.पंडित…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील रांजणी येथील विद्यार्थीप्रिय, अष्टपैलू व्यक्तीमत्व प्रवीण जाधव यांची आपल्या नोकरीची ९ वर्ष सेवा रांजणी येथे केली. अशा प्रदीर्घ सेवेच्या कालावधीत त्यांनी रांजणी जि.प.शाळेचा अंतर्बाह्य विकास करून नवनवीन उपक्रम राबविले. तसेच शैक्षणिक प्रगती साधून अनेक पिढ्यांचे सोने केले. त्यांच्या कार्याची दखल घेत समस्त ग्रामस्थांच्यावतीने त्यांना शिक्षकदिनी ‘उत्कृष्ट आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावर्षापासून पुढे प्रत्येक वर्षी शिक्षक दिनानिमित्त आपल्या उत्कृष्ट अध्यापनाच्या जोरावर आणि अभिनव उपक्रमांच्या आधारे शैक्षणिक प्रगती साधणाऱ्या एका शिक्षकाची निवड करून दरवर्षी एका शिक्षक बंधु-भगिनीचा गौरव करण्यात येईल, असे ग्रामस्थांच्यावतीने ठरविण्यात आले. यावेळी प्रवीण जाधव, नामदेव मंगरूळे, सुभाष बिंदवाल यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुका सह. संस्था संचलित गो.से.हायस्कूल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रमिला वाघ उपस्थित होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील, ज्येष्ठ शिक्षक पी.एम.पाटील, संगीता वाघ, प्रतिभा पाटील उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन, सरस्वती पूजन तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरुवातीला एक ते सहा तासिका प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांनी घेतल्या. विद्यार्थीच शिक्षक झाल्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, शिपाई स्वतः विद्यार्थी झाल्याने अनेक सहभागी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. भविष्यात आम्ही याचा बोध घेऊ, असा आशावाद आपल्या मनोगतात व्यक्त करून दाखविला. विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन आणि नानासाहेब विजय नवल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पी.सी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, ज्येष्ठ शिक्षक व्ही.जी. बोरसे होते. प्रमुख वक्ते म्हणून अनिल पाटील मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थी शिक्षक म्हणून भूमिका…
साईमत, धुळे : प्रतिनिधी ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक वेगळं महत्त्व असतं. मात्र, परिस्थितीअभावी शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा एखादा शिक्षक येणाऱ्या अडचणींवर मात करीत ज्ञानदानाचा पवित्र काम करतो. त्यावेळी तो शिक्षक संपूर्ण समाजासाठी आदर्शवत ठरत असतो. धुळे शहरातील आदर्श शाळेचे शिक्षक अविनाश पाटील हे अशाच पद्धतीने ज्ञानदानाचे पवित्र काम करीत असून, त्यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धुळे शहरातील आदर्श माध्यमिक शाळेत उपशिक्षक पदावर काम करणारे अविनाश पाटील हे शाळाबाह्य मुलांची माहिती घेत असताना नकाणे गावाजवळील एका पाड्यावर राहणारा एक विद्यार्थी परिस्थिती अभावी शाळेत येऊ शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच, या विद्यार्थ्याला शिकवून मोठे…
साईमत, तळोदा : प्रतिनिधी आष्टे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाने शिक्षक दिन साजरा केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावत शिक्षक दिन साजरा केला. प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन शाळेतील मुख्याध्यापक कैलास लोहार, राजू सामुद्रे, राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप वळवी, छात्र शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील शिक्षकांचे ऋणनिर्देश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे जीवन चरित्रावर आधारित पुस्तक व पेन सर्व शिक्षकांना भेट म्हणून दिले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी वेदिका ठाकरे, इयान चिडे, यश धडे, तेजस्वी माळी, हार्दिक मराठे, लावण्या ठाकरे, रूपाली धडे, ओम पाटील यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. यशस्वीतेसाठी शाळेतील विद्यार्थी अनिरुद्ध कोळी,…
साईमत, धुळे : प्रतिनिधी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमासाठी स्थापन समिती प्रमुख यांनी समन्वयातून काटेकोरपणे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. जिल्हास्तरीय कार्यक्रम शासकीय राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बुधवारी (ता. ६) सकाळी दहाला होणार आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रमासाठी आढावा बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे, गणेश मोरे, बी. एस. अकलाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.…
साईमत, धुळे : प्रतिनिधी भारनियमनप्रश्नी शेतकऱ्यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी दोन तास वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना सोमवारी घेराव घातला. दुहेरी भारनियमनाची जाचक अट शिथील करण्यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तीन मागण्या तत्काळ मंजूर झाल्या. उर्वरित मागण्यांबाबत शासन दरबारी प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. दोन आठवड्यांआत सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक गंगाधर माळी यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, श्री. माळी, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, बाबाजी पाटील, आनंदा बडगुजर, राजेंद्र माळी, प्रभाकर चौधरी, विलास चौधरी, संतोष खैरनार, गजानन आधार, मोहन सूर्यवंशी, दिलीप माळी, महेंद्र खैरनार, अशोक महाले, संजय…
साईमत, धुळे : प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष चाळीस हजारावर हातांना रोजगार देणारा शहरातील पॉवरलूम (यंत्रमाग) व्यवसाय विविध संकटांशी सामना करत आहे. या व्यवसायावर अधिकतर मुस्लीमबांधवांचा चरितार्थ अवलंबून आहे.हा व्यवसाय टिकून राहणे आणि त्याला आगामी काळात ताकद देण्यासाठी पूरक योजना लागू करण्याचा अजेंडा असेल. त्यासाठी सरकारला भाग पाडू, अशी हमी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांनी दिली. शहराच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सोमवारी मुस्लीम बहुल भागातील पॉवरलूमची पाहणी केली. त्यांनी मालक, मजुरांकडून नेमक्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राष्ट्रवादीचे रणजीत भोसले, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अमिन शेख, पॉवरलूम मालक इर्शाद अन्सारी, आसिफ अन्सारी, अझर अन्सारी, अश्पाक अन्सारी, राजू अन्सारी, मुजफ्फर हुसेन, आसिफ शेख, जावेद…