शिक्षकांच्या घरी जाऊन शिक्षकांना केले सन्मानित

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील प्रत्येक केंद्रनिहाय एक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज शिक्षक बंधू-भगिनींना चाळीसगाव स्तरीय माजी सभापती पुरस्कृत ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरित केला जातो. माजी सभापती स्मितल बोरसे आणि पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे यांच्या संकल्पनेतून चारवर्षांपासून अतिशय अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला जातो. यंदाच्या पाचव्यावर्षासाठी निवड केलेल्या शिक्षक बंधू-भगिनींच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी, एक मोमेंटो गिफ्ट, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात परिसरातील सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. लख्ख प्रकाशात दिवाळी सणासारखेच वातावरण तयार झाले होते. झेंडूच्या फुलांचा वर्षाव पाहून सर्व कुटुंबातील सदस्य भारावून गेले होते. तसेच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, नातेवाईक मित्र मंडळीसोबत शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व जण आनंदीत झाले होते.

याप्रसंगी खा.उन्मेष पाटील, चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी भोई, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, शिक्षण विस्तार अधिकारी ठाकूर, अमोल नानकर, राकेश बोरसे, शिक्षक संघटनेचे विजय पाटील, राजेश चव्हाण, अर्णव बोरसे, अनिल सूर्यवंशी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.सूर्यवंशी तर आभार अमोल नानकर यांनी मानले.

पुरस्कारार्थी शिक्षकांमध्ये यांचा होता समावेश

पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये संजय घोडे, उमेश भालचंद्र चव्हाण, शर्मिला सुभाष खैरनार, रवींद्र भीमराव पाटील, ज्ञानेश्वर रामराव साळुंखे, जिजाबराव वाघ, शुभांगी एकनाथराव सोनवणे, मंदा तुकाराम सूर्यवंशी, भूषण जगन्नाथ चव्हाण, किशोर महारु पाटील, विनोद रामदास चव्हाण, अनिता दशरथ मोरे, सागर देविदास सोनवणे, भगवान त्र्यंबक मोरे, शर्मिला सुभाष खैरनार, प्रदीप हिम्मतराव जाधव, सुदर्शन वसंतराव पाटील, महेंद्रसिंग जयसिंग सिसोदे, निंबा विठ्ठल पाटील, सदाशिव रामदास बाविस्कर, शेख अजीज शेख बशीर खाटीक, खूशाल दत्तू अहिरे यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here