साईमत, तळोदा : प्रतिनिधी येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर येथे माध्यमिक मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर होते. सुरवातीला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रवींद्र गुरव, सेवानिवृत्त प्राचार्य अजित टवाळे, मुख्याध्यापक सी.एम.पाटील, जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त सुनील परदेशी यांचा सत्कार केला. सभेत गटशिक्षणाधिकारी यांनी विविध शैक्षणिक योजनेचा आढावा घेतला. तसेच मानव विकास मिशन योजना, सेवा हमी कायदा, विद्यार्थ्यांच्या नावात, जन्म तारखेत बदल करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव यांनी एमडीएम, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपस्तके योजना यांचे रेकॉर्ड कसे ठेवावे, याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुका मुख्याध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी आजच्या तरूणांनी धार्मिक गुण अंगी जोपासण्याची गरज आहे. तरूणपणात अर्धे आयुष्य वेळेअभावी गमावून बसतो. त्यानंतर जेव्हा काठी टेकायची वेळ येते तेव्हा आपल्याला देव आठवतो. जर मुलांवर किंवा परिवारावर धार्मिकसह चांगले संस्कार दिले तर नक्की त्यांचे भविष्य उज्ज्वल होवू शकते, असे मत दैनिक ‘साईमत’चे उपसंपादक शरद भालेराव यांनी व्यक्त केले. ते पिंप्राळा भागातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आयोजित आरतीनंतर मनोगतात बोलत होते. यावेळी शरद भालेराव आणि सौ.रेखा भालेराव यांच्याहस्ते महादेवाची आरती करण्यात आली. यावेळी दोघांचा मंदिराच्या ट्रस्टतर्फे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नरेश बागडे, धनंजय सोनार, मधुकर ठाकरे, देविदास पाटील,…
साईमत, नवापूर : प्रतिनिधी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री कृष्ण जन्मोत्सवानिमित्त जगन्नाथ महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. गुरुवारी जुन्या महादेव मंदिर गल्लीत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मंदिरात फुगे व फुलांची आकर्षक सजावट केली होती. अनेकांनी उपवास करण्यास प्राधान्य दिले होते तर लहान बालकांना बाळ कृष्ण सजविण्यात आले होते. श्रीकृष्ण जन्मोत्सवप्रसंगी भजन, कीर्तन व गरबा रास खेळण्यात आले. बुधवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण जन्मोत्सव व आरती करण्यात आली. याप्रसंगी तरुण मंडळीसह महिलाही सहभागी झाले होते. नवापूर शहरातील श्रीकृष्ण मंदिरात सरदार चौक ते जगन्नाथ महादेव मंदिर मार्गावर गोविंदा…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने ग्राहक पंचायतीचा स्थापना दिवस नुकताच उत्साहात साजरा केला. सर्वप्रथम ग्राहकतीर्थ स्व.बिंदू माधव जोशी, स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी अ.भा.ग्राहक पंचायत अमळनेरचे सक्रिय कार्यकर्ते जयंतीलाल वानखेडे यांची महाराष्ट्र मराठी पत्रकार तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. श्रीमती विमल मैराळे यांनी सभासद वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दलही त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. नूतन सभासद म्हणून आर.एस.पाटील यांनी प्रवेश घेतला. यावेळी त्यांचाही सत्कार केला. कार्यक्रमास ऊर्जा मित्र सुनील वाघ, गोकुळ बागुल, शिवाजीराव पाटील, हस्ती बँकेचे व्यवस्थापक अनिल शिंपी, राजेश अग्रवाल, मेहराज बोहरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी, ॲड.भारती…
साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी येथील पंचायत समिती कार्यालय आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेतर्फे माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील निवडक माध्यमिक शिक्षिकांचे शिबिर सोमवारी, ११ सप्टेंबर रोजी तर शिक्षकांचे शिबिर बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे. शिंदखेडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सहकारी पतसंस्थेच्या शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर सभागृहात सकाळी अकरा ते पाच या वेळेत हे शिबिर होणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांनी शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील यांनी केले आहे. आयोजनासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.परेश शाह, शाखाध्यक्ष मनोहर भोजवाणी, कार्याध्यक्ष प्रा.दीपक माळी, सचिव भिका पाटील, शिबिर संयोजक…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी ग्रामीण भागातील युवा उद्योजक निर्मल नेमाडे यांची मुबंई येथे पार पडलेल्या सेमिनारमध्ये त्यांच्या स्टार्टअपची निवड केली आहे. यामुळे कळमसरे गावात मानाचा तुरा रोवला गेला आहे. उपक्रमात जवळपास १० हजाराहुन अधिक रजिष्ट्रेशन झाले होते. मात्र, वेळोवेळी झालेल्या मुलाखतीत अवघ्या ६० स्टार्टअपची निवड करण्यात आली. त्यात निवड झालेले कळमसरेचे निर्मल नेमाडे यांच्या उपक्रमाचाही समावेश आहे. अमळनेर तालुक्यातील मूळचे नांदेड येथील रहिवासी परंतु वैद्यकीय व्यवसायानिमित्त कळमसरे येथे स्थायिक असलेले डॉ.सुधाकर नेमाडे व डॉ.विजया नेमाडे यांचे लहान सुपुत्र युवा उद्योजक निर्मल सुधाकर नेमाडे यांच्या स्टार्टअपची कॉर्नल विद्यापीठ, न्यूयॉर्क आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअपसाठी असणाऱ्या कॉर्नलमहा ६० या उपक्रमात…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. प्रमुख पक्षांचे नेते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. त्याचवेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जबद्दल निषेध नोंदविण्यात येत आहे. जिल्हा बंदची हाक देत सरकारचा निषेध करण्यात येत आहे. पाचोरा तालुक्यात तिरडीवर टरबूज ठेवून अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज केला होता. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे. दरम्यान, पाचोरा येथे अंतरवाली सराटी येथील घटनेचा निषेध म्हणून मराठा समाज बांधवांनी…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील सूर्या फाउंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या पटांगणात सुंदर रांगोळी व आकर्षक दहीहंडी सजविण्यात आली होती. जन्माष्टमी उत्सवाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व गोपिका यांची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. शाळेच्या चेअरमन अर्चना सूर्यवंशी, संचालक प्रशांत सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरूवात झाली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुंदर आणि आकर्षक पेहराव करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. “हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की” च्या गजरात विद्यार्थी व विद्यार्थिनी दोघांनी दहीहंडी फोडण्यासाठी थर लावत सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. संपूर्ण शाळेचा परिसर आनंदाने दुमदुमून गेला होता. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात मोठ्या संख्येने…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा आणि जळगाव नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त चोपडा तालुका व शहरातील विविध शाळा व महाविद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शुभेच्छापत्र देवून सन्मान केला. उपक्रमांतर्गत शहरातील समाजकार्य महाविद्यालय, पंकज विद्यालय, कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय, विवेकांद विद्यालय, प्रताप विद्या मंदिर व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद केंद्र शाळा, निमगव्हाण व चौगाव, जय श्री दादाजी हायस्कूल, तांदलवाडी येथे कार्यरत व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा ९० शिक्षकांना शुभेच्छापत्र देवून शिक्षक दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजक तथा रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, सचिव गौरव जैन, खजिनदार मयूरेश जैन, रोटरॅक्ट क्लबचे सदस्य…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील केकतनिंभोरा येथील दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (आयसीएसई पॅटर्न) येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. तसेच गोपाल कृष्ण भगवान यांचा जन्माष्टमीचा कार्यक्रमही दहीहंडी फोडून साजरा केला. संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व बाल गोपाळ कृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी ओशन इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक, शिक्षिका यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. तसेच ज्युनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांनी वर्गात शिक्षक बनून ज्ञानार्जनाचे काम केले. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा परिपाठ विद्यार्थ्यांना विषद…