साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेजमध्ये प्राचार्य पी.एम.कोळी यांच्या आदेशान्वये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आर्मी स्कूलमध्ये बहुसंख्य विद्यार्थी हे शेतकऱ्याची मुले आहेत. त्यांनाही या सणाची आपसूकच ओढ असते. त्यामुळे त्यांना सणाचा आनंद घेता यावा, यासाठी नवलभाऊ कृषी महाविद्यालयाच्या मालकीची बैल जोडी आणून त्यांचे पूजन प्राचार्य व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बैलांना खाऊ-पिऊ घातले गेले. शिंगांना रंगरंगोटी करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी बैल पळवून आनंद घेतला. खऱ्या अर्थाने सांस्कृतिक परंपरांची जोपासणूक या माध्यमातून आर्मी स्कूलमध्ये करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य पी.एम. कोळी, संतोष पवार, शिवाजी पाटील, श्री.साळुंखे, हेमंत मोरे, मिलिंद बोरसे आदी उपस्थित…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी सेवा पुरवठादार एजन्सीमार्फत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरविण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकवटल्या आहेत. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. शासनाने खासगी एजंसीमार्फत शैक्षणिक क्षेत्रात कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा सर्व संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यात शिक्षक भारती, माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ, ओबीसी शिक्षक परिषद यासह विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना नुकतेच निवेदन दिले. निवेदनावर मुख्याध्यापक संघाचे तुषार बोरसे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यध्यक्ष आर.जे.पाटील, टीडीएफचे अध्यक्ष सुशील भदाणे, उमेश…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अमळनेरहून धरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी कुर्हे-सती माता मंदिर येथे अंतर्गत बोगद्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता दूचाकी वगळता सर्व जड वाहनांसाठी पुढील चार महिन्यासाठी बंद केला आहे. वाहनधारकांनी अमळनेरहून धरणगावकडे जाण्यासाठी ढेकू-सारबेटे मार्गाचा वापर करावा, असे आवाहन अमळनेर रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. अमळनेरहून-धरणगाव जातांना चांदणी कुर्हे-सती माता मंदिर येथे फाटक क्रमांक १३७ येथे एका बाजूच्या बोगद्याचे काम झाले आहे. एका बाजूचे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी, १८ सप्टेंबरपासून हा मार्ग पुढील चार महिन्यांसाठी जड वाहनांसाठी बंद असणार आहे. दूचाकी वगळता एसटी, ट्रक, ट्रॅक्टर, मालट्रक यांसारख्या जड वाहनांनी धरणगाव जाण्यासाठी ढेकू-सारबेटे या…
साईमत, असलोद, ता. शहादा : वार्ताहर शहादा तालुक्यातील शोभानगर येथे कृषी विभाग व आत्मा योजनेअंतर्गत ‘किसान गप्पा गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सरपंच डेमच्या वसावे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्रा.कुणाल पाटील, बायर क्रॉप सायन्सचे जिल्हा व्यवस्थापक समाधान म्हस्के, मंडळ कृषी अधिकारी एकनाथ सावळे, पीएमएफएमई योजनेचे डी.आर.पी. मनोज शुक्ला, मा.पं.स. कैलास वसावे, प्रगतशील शेतकरी उल्या वसावे, केशव वसावे, कृषी पर्यवेक्षका भिकुबाई पावरा, कृषी सहाय्यक कल्याण पवार आदी उपस्थित होते. प्रा.कुणाल पाटील यांनी कापूस पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, गुलाबी बोंडअळी निरीक्षणासाठी कामगंध सापळे लावावे, याबाबत सविस्तर माहिती दिली. बायर क्रॉप…
साईमत, धुळे : प्रतिनिधी तालुक्यातील कापडणे, शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा आणि साक्री तालुक्यातील बोपखेल येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. याप्रकरणी पोलिसात ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. कापडणे गावातील घटना धुळे तालुक्यातील कापडणे येथील राहुल अशोक पाटील (वय ३०) या तरुणाने त्याच्या राहत्या घरातील छताच्या लाकडी कड्याला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्याला लोकांच्या मदतीने खाली उतरवून सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सोनगीर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.…
साईमत, धुळे : प्रतिनिधी महाराणा प्रताप पुतळा ते खोडाई माता परिसर लक्झरी बस बेशिस्त व वाहतुकीला अडथळ्यासंदर्भात मागणी केली असता नंदुरबार शहर वाहतूक शाखेत यासंदर्भात बैठक झाली. त्यात गणेशोत्सवानंतर गावाबाहेर गाड्या लावाव्यात व लक्झरी थांब्याचे नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीला नंदुरबार वाहतूक शाखेत वाहतूक निरीक्षक भरत जाधव, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांच्यासह लक्झरी चालक-मालक उपस्थित होते. लक्झरींनी रस्त्यावर फेकलेली काच तसेच रहदारीला अडचण निर्माण होईल असे दिवसभर गाड्या रस्त्यावर उभ्या करून ठेवणे व सायंकाळी एकाचवेळी सर्व लक्झरी भरणे यावर चर्चा झाली. त्यावर शिंपी यांनी सांगितले की, एकूण १३ लक्झरी आहेत. सर्वांचा सुटण्याचा वेळ साधारण सायंकाळी सहा ते सात…
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी हरणखुरी (ता. धडगाव, जि. नंदुरबार) येथील याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत झालेल्या कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क पहिल्या जागतिक परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार वर्ष २०२०-२१ साठी प्रदान करण्यात आला. सविता नाना पावरा आणि मोचडा भामटा पावरा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ही समिती बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनअंतर्गत कार्यरत आहे. यावेळी…
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी तालुक्यातील धानोरा येथून दोन लाख रुपये किमतीचे सागवानी लाकूड नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. बुधवारी रात्री तपासणी पथकाने याठिकाणी धाड टाकून लाकूड हस्तगत केले. धानोरा येथे हिराभाई भिलाभाई शिकलीकर याच्या घराजवळ पडक्या जागेत लाकूड साठा असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. पथकाने या ठिकाणी भेट देत तपासणी केली. तेव्हा सागाचे दोन लाख रुपयांचे लाकूड मिळून आले. संबंधिताकडून सागवानी लाकडाचे चिरकाम केलेले दरवाजे फळी, चौकट नग, सोफा आदी लाकडी सामान तसेच लाकूड कटाईचे मशीन मिळून आले. याप्रकरणी तलावपाडा वनरक्षकांनी वन गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वनसंरक्षक ऋषिकेश, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय वनाधिकारी एस.एम. सदगीर, सहायक…
साईमत, नवापूर : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचपाडा शिवारातील नव्या शर्तीच्या जागेतून विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. जे.एम.म्हात्रे कंपनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी विना परवाना गौण खनिज उत्खनन करून दगड व मुरूम वापर करीत आहेत. त्यात शासनाचा महसूल बुडत आहे. कोणाच्या परवानगीने गौण खनिज उत्खनन केले जाते. गटाची चौकशी १५ ऑक्टोबरपर्यंत न केल्यास उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथे जनहित याचिका दाखल करावी लागेल, असे तक्रार वजा निवेदन मनीष ओमप्रकाश अग्रवाल यांनी दिले आहे. अशी तक्रार नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अप्पर जिल्हाधिकारी, गौण खनिज शाखा नंदुरबार, नवापूर तहसीलदार, चिंचपाडा (ता. नवापूर) मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तक्रारीत…
साईमत, नवापूर : प्रतिनिधी अंध अपंगांच्या मदतीसाठी राज्यभरातील अंध कलाकारांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन अंध अपंग प्रगती सोसायटीतर्फे केले आहे. शनिवारी, १६ रोजी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान शहरातील सु. हि.नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सयाबाई नाईक सभागृहात चेतना मेलडी ऑर्केस्ट्रा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजकांतर्फे शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्र परिषदेला संस्थेचे तात्या पानपाटील, रावसाहेब कांबळे उपस्थित होते. राज्यातील विविध भागातून १५ अंध व गुणी नामवंत कलावंत या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बेरोजगार व अंध अपंगांच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक तात्या पानपाटील यांनी दिली. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह…