साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील पायल संगीत नृत्यालय आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती नगरातील डॉ.जी.डी.बेंडाळे वेल्फेअर सेंटरच्या नथमल लुंकड सभागृहात गायन-वादन-कथ्थक नृत्यावर आधारीत ‘कृष्ण आराधना’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ४८ विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यावेळी सहभागी स्पर्धकांनी आपापली कला सादर करुन उपस्थितांचे मने जिंकून घेतली. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तर विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष कल्पेश शाह, सचिव दिनेश थोरात, भुवनेश्वरसिंग, रमा सिंग आदी उपस्थित होते. यावेळी पालक वर्ग उपस्थित होते.
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे विदेशी भाषा आणि संशोधन विषयक प्रमाणपत्र शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय आणि विदेशी भाषा जसे की, संस्कृत, उर्दू, इंग्रजी संभाषण कौशल्य, जर्मन, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन भाषा A१ आणि A२ स्तर, मोडीलिपी या शिक्षणक्रमांसोबत लिंग संवेदनशीलता, सायबर गुन्हे आणि कायदा, बौध्दिक संपत्ती हक्क, मानसशास्त्रीय कसोट्या आणि मोजमाप, संशोधन पध्दतीची मूलतत्वे, संशोधनासाठी संबंधित साहित्य आणि ग्रंथसुची लेखन, संशोधन प्रस्ताव लेखन, एसपीएसएसद्वारे संशोधन माहिती विश्लेषण, संशोधन अहवाल आणि पेपर लेखन या प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू केले आहेत. हे सर्व प्रमाणपत्र शिक्षणक्रम ऑनलाईन पध्दतीने…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षा १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत कोणताही तांत्रिक व्यत्यय न येता अत्यंत सुरळीत पार पडल्या. यासाठी ४ हजार ४३७ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५२७ परीक्षार्थींनी पेट परीक्षा दिली. विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेच्या इमारतीजवळ ऑनलाईन परीक्षा केंद्रात सकाळी ८ ते सायं. ५.३० या कालावधीत रोज चार बॅचेसमध्ये सहा दिवस परीक्षा घेण्यात आल्या. प्रत्येक बॅचमध्ये १९६ ते २३० विद्यार्थी होते. सहा हॉलमध्ये परीक्षा देण्यासाठी संगणकांची व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आल्यास समस्येचे निराकारण करण्यासाठी तंत्रज्ञांची नियुक्ती केली होती. परीक्षेची तांत्रिक जबाबदारी निर्मल सॉफ्टवेअर कंपनीकडे दिली होती. चार विद्याशाखानिहाय ४४…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शालेय नाटक स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. त्यात बालवाडीपासून ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नाटक स्पर्धेचे आयोजन शाळेत केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी व विद्यार्थ्यांना प्रेरित करणाऱ्या नाटकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. प्लास्टिक कचरा मुक्ती, मोबाईलचे दुष्परिणाम, मी आहे डॉ.आनंदीबाई जोशी, आहाराचे महत्व अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाचे कसब वापरले. नाटकाचे परीक्षण विशाल जाधव, योगेश लांबोळे यांनी केले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी विद्यार्थ्यात नाटकातून कला जोपासणे हा महत्वाचा गुण येत असतो. अध्यक्षा मंगला दुनाखे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शासनाने पर्यटन व सांस्कृतीक विभागांच्या मार्फत शिक्षण विभागाला महापुरुषांशी निगडीत शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचे अर्थ सहाय्य केले आहे. या योजनेत अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलचा समावेश करावा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आले आहे. शासनाने पर्यटन व सांस्कृतीक विभागांमार्फत शिक्षण विभागाला महापुरुषांशी निगडीत शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचे अर्थ सहाय्य केले आहे. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, नगर, नाशिक, आदी भागातील शाळांचा समावेश आहे. मात्र, खान्देशातील एकाही शाळेचा समावेश नाही. सानेगुरुजींसारख्या थोर स्वातंत्र्य सेनानी, आदर्श शिक्षक व महापुरुषाच्या निगडीत असलेल्या प्रताप हायस्कूल, अमळनेर,…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कल्याणेहोळ येथील ३३ वर्षीय तरूणाचा तोल जावून नदीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कल्पीत जगन्नाथ निकम (रा. कल्याणेहोळ, ता.धरणगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. सविस्तर असे की, कल्पीत निकम हा आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे वास्तव्याला होता. बुधवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर असलेल्या नदीच्या किनाऱ्याजवळून जात होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्यातच त्याचा बूडून मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी मतदारसंघात ग्रामीण भागातील दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यास ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी दोन्ही मिळून सुमारे १७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शासन मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी अनेक रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यात अमळनेर मतदारसंघातील दोन महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश झाला आहे. याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन आदेश दि.१३ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यात अमळनेर मतदारसंघातील प्रजिमा-५ (दहीवद) ते नगाव रस्ता -साखळी क्रमांक ००० ते ४/६६०, ४/७६० ते ५/६५० या ५.५० कि.मी. रस्त्यासाठी ४७१.६५ लाख एवढा निधी मंजूर…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी येथे स्वच्छता मोहिमेत थेट घंटागाडीत सवारी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी सोबतच स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर येथे भेट दिली. भेटीत त्यांनी शहरामध्ये स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता मोहिमेत स्वत: सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यासोबत स्वतः साफसफाई केली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी स्वत: कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीत बसून संपूर्ण माहिती जाणून घेतली. थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच घंटागाडीत बसलेले पाहून अनेकांना धक्का बसला. त्यांनी घंटागाडीमध्ये बसून जामनेर शहरांमधील स्वच्छतेची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामे हे आयुष प्रसाद यांनी गतीमान आणि सुटसुटीत केली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामांना गती मिळालेली…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड बुद्रुक गावात जुन्या वादातून एका तरूणाला शिवीगाळसह मारहाण करत चाकूने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचार घेतल्यानंतर जखमी तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी, २० सप्टेंबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, टिकाराम रामचंद्र पाटील (वय ३८, रा. वराड बुद्रुक ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एक वर्षांपूर्वीच्या जुन्या वादातून गावात राहणारा तुषार भगवान पाटील यांच्यासह इतरांनी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता टिकाराम पाटील याला अश्लिल शिवीगाळ व मारहाण केली. तुषार पाटील याने हातात चाकू घेवून वार करून गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाटणा येथील चंडिका मंदिराच्या परिसरात ऋषीपंचमीनिमित्त महिला भाविकांनी गर्दी करून पूजा केली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांसह वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यातील पाटणा येथील चंडिका मंदिराच्या परिसरात ऋषीपंचमीनिमित्त महिलांनी हजेरी लावत पूजन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाची गर्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिलांना सुरळीत दर्शन घडवून आणले. यामुळे वन्यजीव विभागासह पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेचे सर्व ठिकाणाहून कौतुक करण्यात येत आहे. यशस्वीतेसाठी सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, स.पो.नि. तुषार देवरे, डी.के. जाधव वनपाल (प्रभारी- वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) चाळीसगाव), ऋत्विक तडवी (वनरक्षक पाटणा), अशोक मोरे (विशेष वनरक्षक पाटणा), उमेश सोनवणे…