साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ओबीसी आरक्षणासाठी साखळी उपोषणाचा ३ दिवस सुरु आहे. तिसऱ्या दिवशी उपोषणास उद्योजक तथा ज्येष्ठ समाजसेवक वर्धमान धाडीवाल यांनी नुकतीच भेट दिली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. वर्धमान धाडीवाल, रामलाल मिस्तरी, गणेश गवळी, योगेश पाटील, विजय गायकवाड, सागर आगोने, पत्रकार मुराद पटेल यांनी उपोषणाला पाठिंबा दिला. तसेच राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ आयोजित स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलमधील आठवीची विद्यार्थिनी अक्षरा विजय सैतवाल हिने राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला. ‘निसर्ग एक कलावंत’ हा तिच्या निबंधाचा विषय होता. राज्यभर नावलौकिक असलेली ही शालेय जीवनातील महत्त्वाची अशी स्पर्धा आहे. तिला संस्थेचे अध्यक्ष डॉ. मकरंद नारखेडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख रक्कम पाचशे रुपये, पुस्तके व स्मृतीचिन्ह नुकतेच प्रदान करण्यात आले. याप्रसंगी साहित्यिक रोमा नारखेडे, अण्णासाहेब बेंडाळे यांच्यासह संस्थेचे संचालक उपस्थित होते. अक्षरा ही मालदाभाडी शाळेचे वृक्षमित्र विजय सैतवाल यांची सुकन्या आहे. तिला समिती प्रमुख एस. एस. शिसोदे यांचे मार्गदर्शन लाभले.…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या तीन महिन्यांपासून धमकी देत तिच्यावर अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, अमळनेर शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, त्याच परिसरात विशाल बाबुराव कोळी(वय२०) हा राहतो. १३ जुलै ते १७ सप्टेंबर दरम्यान विशाल कोळी याने पीडित मुलीला तिच्या लहान भावाला जीवे ठार मारण्याची धमकी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांना धक्काच बसला. पीडित मुलीला…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने भारतीय सैन्यात सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, एमएसएफ अशा विविध पदांवर निवड झालेल्या नऊ जवानांचा व टॅक्स असिस्टंट पदावर कुमारी दामिनी हिची निवड झाल्याबद्दल सन्मान समारंभ आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी अमळनेर येथील मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पीएसआय नरसिंग वाघ तसेच जानवेचे सरपंच वकील बाबा, उपसरपंच गोपाल पाटील, माजी सरपंच शिवाजी जुलाल पाटील, नवल पाटील, गावातील नागरिक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निवड झालेल्या जवानांचा सन्मानचिन्हासह वाचनीय पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. यशस्वीतेसाठी कृष्णा पाटील, अनिल पाटील, शरद शेनपडू, पाटील, बाळू पेंटर, वाचनालयाचे कर्मचारी एकनाथ…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील मार्च १९८७ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक साहित्य झांज भेट देण्यात आली. यावेळी पोतदार जिनियस स्कूलचे संचालक पंढरी पाटील, हरिष ट्रेडर्सचे दिनकर माळी, माजी सैनिक किशोर पाटील, मुख्याध्यापिका नरवाडे आदी उपस्थित होते. शाळेत सांस्कृतिक साहित्य खराब झाले होतेे. बाकी साहित्य आम्ही मिळविले. तुमच्या बॅचकडून आम्हास ५० झांज द्यावे, ही माहिती आमच्या गु्रपवर टाकली. त्यानंतर लागलीच ऑनलाईन पैसा जमा केला. गणपती स्थापनेच्या दोन दिवसाआधी ६५ झांज विद्यार्थ्यांना दिले. त्यामुळे शाळेला सुंदर रॅली साजरी करता आली. त्यामुळे शाळेकडून प्रातिनिधिक स्वरूपात तिघांचा सत्कार करण्यात आला.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी सावखेडा शिवारातील जलराम नगरातून बेपत्ता झालेल्या ४३ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा गिरणा नदीच्या पत्रात मृतदेह आढळून आल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संतोष रामधन पाटील (वय ४५, रा. जलाराम नगर, सावखेडा शिवार, जळगाव) असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे. सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील जलराम नगरात संतोष पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने मानसिक स्थिती बरोबर नव्हती. त्यातच बुधवारी, २० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. याबाबत जळगाव तालुका पोलिसात…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जैन धर्मियांचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वची सांगता संवत्सरीच्या क्षमापना दिवसाला झाली. मन, वचन, कायामुळे वर्षभरात झालेल्या चुकामुळे, व्यवहारामुळे, कटू बोलण्याने, कळत नकळत एकमेकांचे मन दुखावले गेल्यामुळे, हृदयाच्या अंत:करणापासून एकमेकांचा घरी जावून ‘मिच्छामी दुक्कडम-खमत खामना’ म्हणत क्षमा देत व घेत साजरी केली. डिजिटल व टेक्नोसव्ही युगामध्ये व्हॉट्सॲप व अन्य सोशल मीडियाद्वारा एकमेकांना ‘मिच्छामी दुक्कडम-खमत खामना’ म्हणत क्षमापना करण्यात आली. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ तसेच श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ तसेच श्री तेरापंथ जैन सभा, जळगाव यांच्यावतीने सामुदायिक क्षमापनाचे आयोजन आपापल्या धर्मस्थळी केले होते. ह्या दिवशी दिगंबर जैन समाजाच्या पर्युषण पर्व अर्थात दस…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनमध्ये ‘सीएनसी प्रोग्रामिंग ॲन्ड मशिनिंग’वर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. किशोर महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.हेमंत इंगळे, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा.कैलास मखिजा (यंत्र विभाग प्रमुख, तंत्रनिकेतन) सर्व अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. किशोर महाजन यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेझेंटेशनमध्य सीएनसीमध्ये वापरण्यात येणारे जी कोड व एम कोड या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानंतर काही ड्रॉइंग्स विद्यार्थ्यांना दाखवून जी कोड व एम कोड या ठिकाणी कसे अप्लाय करता येतील, यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हातभट्टीची बेकायदेशीर दारू विक्रीसह वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. आझाद बहादुर भाट (वय ४१, रा. रामदेवबाबा मंदिराजवळ, सुप्रिम कॉलनी) असे स्थानबध्द केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणारा आझाद बहादुर भाट याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहे. असे असतांनाही त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. या…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी रेल्वे परिसरात दररोज अपघात आणि आत्महत्यासारख्या घटना घडत आहेत. या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या. रेल्वे अपघातातबाबत करावयाच्या उपाययोजनासाठी भुसावळ रेल्वे प्रबंधक व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार सुरेश भोळे, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, भुसावळ रेल्वे प्रबंधक इति पाण्डेय, विभागीय परिचालन प्रबंधक योगेश पाटील, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किरण पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, रेल्वे क्रॉसिंग करतांना तसेच रेल्वेच्या क्षेत्रात आत्महत्या, नैसर्गिक…