साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण परिसरातील एका भागात राहणाऱ्या ८ वर्षीय चिमुकलीसोबत मावशीच्या पतीने अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मावसावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील एका भागात ८ वर्षीय चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी, २० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चिमुकलीच्या मावशीच्या पतीने तिला जवळ ओढून तिच्या सोबत अश्लिल चाळे केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल केला आहे.…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जळगाव मनपा क्षेत्रातील १४, १७, १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेत सिद्धीविनायक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले आहे. स्पर्धेचे उद्घाटन सिद्धीविनायक फाउंडेशनच्या संचालिका डॉ.अमृता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त किशोर चौधरी, विशाल फिरके, सिद्धीविनायक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. पी. खोडपे, प्रशांत जगताप, अनिल माकडे, रणजीत पाटील, सरस्वती ढाके, दिगंबर महाजन आदी उपस्थित होते. झपाट्याने वाढणाऱ्या यांत्रिकी जीवनात आट्यापाट्यासारखे…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी भुसावळ येथील तृतीयपंथी चांद सरवर तडवी महाराष्ट्रातील पहिली रिक्षा चालक होणार असून मराठी प्रतिष्ठान मार्फत ऑटो रिक्षा प्रशिक्षण, लायसन्स,परमिट,बॅच विनामूल्य बनवून दिले जाणार असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी दिली. उच्चशिक्षित चांद सरवर तडवी हिने सन्मानाने पैसे कमवाव्ो या विचारधारेतून ऑटोरिक्षा चालक बनण्याचा निर्णय घेतला आहे. पिंक ऑटो रिक्षा चालक रंजना सपकाळे यांनी तिला प्रोत्साहित केले. चांद सरवर तडवीची लायसन्स प्रक्रिया आज पूर्ण झाली असून पुढच्या आठवड्यामध्ये कच्चे लायसन प्राप्त होणार आहे. त्यानंतर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तिला ट्रेनिंग दिले जाणार आहे. एखाद्या सहकारी बँकेतून िंकवा राष्ट्रीयकृत बँकेमधून चांद तडवी हिला कर्ज प्रकरण करू दिले…
साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रता मुद्यावर सुनावणी घेण्यास विलंब होत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर पुन्हा कामाला लागले आहेत. त्यांनी दिल्लीत जावून तेथील कायदेतज्ज्ञांशी या प्रकरणी चर्चा केली आहे. पुढील आठवड्यात सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना स्पष्ट सांगितले. राहुल नॉर्वेकर गुरुवारी दुपारी नवी दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांच्या दौऱ्याबाबत वेगवेगळ्या अटकळी सुरू झाल्या. त्यातच राहुल नॉर्वेकर यांनी स्वतः शुक्रवारी दिल्लीत आपण कुणाला भेटलो व त्यात नेमकी कोणती चर्चा झाली याचे स्पष्टीकरण दिले. माझी काही कायदेतज्ज्ञांशी चर्चा झाली. एकूणच अपात्रतेचा विद्यमान कायदा बदलत जाणारा आहे. या कायद्यात परिस्थितीनुरुप…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर या बिलापोटी अवाजवी रक्कमेची मागणी करून अडवणूक करीत असल्यामुळे आमरण गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. ‘शासन आपल्या दारी, अधिकारी मागतात टक्क्यांची भागेदारी’ असे चित्र सध्या दिसत आहे. या उपोषणात नावासहित नगरपालिकेल्या वरिष्ठ एक महिला अधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप म्हणजे मंत्रालयात ‘आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातयं’ अशी वस्तुस्थिती सध्या राज्यामध्ये पहावयास मिळत आहे. सुरेश गणसिंग पाटील यांनी ‘सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँड सर्व्हिसेस’ नावाने नगरपरिषदेकडून जंतूनाशके पुरविणे व घंटगाड्या दुरुस्ती करणे अशी पुरवठा व सेवेची कामे घेतली होती. या कामाची रक्कम ३ एप्रिल २०२३ रोजी १५ लाख ६ हजार ३०० रुपयांपैकी…
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथील स्वप्नील राजेंद्र जाधव ह्या तरुणाने कुस्ती स्पर्धेत जिल्हा पातळीवर विजय मिळविल्याने त्याची आता विभागीय स्तरावर निवड झाली आहे. १९ वर्ष वयोगटातील व ६१ किलो वजन गटात ही निवड झाली आहे. त्यामुळे त्याला आता विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. स्वप्नीलने सुमनबाई गिरीधर पाटील ह्या महाविद्यालयाकडून कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. त्याला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सचिन भोसले, ग्रा.पं.सदस्य समाधान पवार, राजेंद्र जाधव, कोळगावचे माजी सरपंच अनिल बिऱ्हाळे, विनोद वाकोडे, दामू वाकोडे, वैभव बोरसे, राज वाकोडे, निलेश जाधव, कुणाल राजपूत, कल्पेश बोरसे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे कजगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
साईमत, जामनेर : प्रतिनिधी भविष्यात जामनेर तालुक्यात खेळाडूंसाठी नवीन क्रीडा संकुल तयार होणार आहे. तालुक्यातील १० क्रीडाप्रकार एकाच ठिकाणी होतील. तसेच शारीरिक सुदृढता व मानसिक स्वास्थाबद्दल महत्त्व नवनियुक्त जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी खेळाडूंना पटवून दिले. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नगरपंचायत समिती, जामनेर तालुका ॲथलेटिक्स असो. आणि इंदिराबाई ललवाणी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वयोगट १४, १७ व १९ वर्षाआतील मुले, मुली तालुकास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा नुकत्याच इंदिराबाई ललवाणी विद्यालयाच्या पटांगणावर उत्साहात घेण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जामनेर तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण,…
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर भडगाव तालुक्यातील कजगाव येथील गावातील रस्ते पावसामुळे अत्यंत खराब झाल्याने वृद्ध व्यक्ती, नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून डास, मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साथीच्या रोगाची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. रस्त्यावर तसेच खड्डयात मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात यावी, याकडे ग्रामपंचायतने व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कजगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत मात्र गौणखनिज टाकण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे कजगावच्या सरपंचांनी सांगितले.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मुंबई महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार असलेल्या रुग्णांसाठी मार्गदर्शनानिमित्त चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती आणि महात्मा फुले आरोग्य संकुल ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्या.एन.के.वाळके होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते एच.आय.व्ही. आजारासंबंधित माहितीपत्रकाचे अनावरण केले. शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक रमेश पोतदार यांनी स्वरचित कविता सादर केली. समुपदेशक नामदेव अहिरे, लिंक वर्कर छाया सूर्यवंशी, साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर यांनी एच.आय.व्ही. आणि इतर शारीरिकरित्या पसरणारे आजार…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील पुनगाव शिवारातून एका गावठी कट्ट्यासह दोघांना पोलिसांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. विनापरवाना शस्त्र बाळगण्याची परिसरातील आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील पुनगाव येथे एकाजवळ गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची गोपनिय माहिती २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पो. कॉ. संदीप भोई, प्रकाश शिवदे यांचे पथक तयार करत घटनास्थळी रवाना केले. पथकाला पुनगाव शिवारातील महादेव मंदिराचे अलिकडे पोल्ट्री फार्मजवळ दोन इसम फिरत असल्याचे…